कारची धडक बसून मिनिडोअर रिक्षा पलटी

अमित गवळे
सोमवार, 7 मे 2018

पाली (रायगड) : कारची मागून धडक बसुन मिनिडोअर रिक्षा पलटी झाली. उध्दर पाली मार्गावर खवली गावाजवळ रविवारी (ता.6) हा अपघात झाला. या अपघातात 12 जण जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मिनिडोअर रिक्षा चालक अंकुश बळीराम आरेकर रा. चोपडेवाडी हे रविवारी (ता.6) सायंकाळी त्यांची मिनिडोअर रिक्षा उध्दर पाली रोडने चालवीत जात होते. यावेळी खवली गावाच्या हद्दीत रिलायबल प्रा.लि. स्टोन क्रेशर कंपनीसमोर स्वप्नील भोसले(रा.ठाणे) यांच्या कारने मिनिडोअर रिक्षाच्या मागील टायरला जोरदार धडक दिली. 

या अपघातात मिनिडोअर रिक्षाचे मागील एक्सल तुटून रिक्षा पलटी झाली. या अपघातात राजेश्री रघुनाथ पाटील, (वय.60) रा. मोहोपाडा, दुर्गा योगेश पवार (वय.२७), रोया योगेश पवार (वय.२), योगेश मोरु पवार (वय माहित नाही) तिन्ही रा. करंजघर, किशोर विठ्ठल आचार्य (वय.५९), मोहीनी चंद्रकांत वाघमारे (वय.३०),मानसी चंद्रकांत वाघमारे (वय.५), चिन्मय चंद्रकांत वाघमारे(वय.७) सर्व राहणार उध्दर, प्रित शशिकांत जठार (वय.३१)रा. सावरसई, ता.खालापूर, प्राप्ती शशिकांत जठार (वय.६),रविंद्र अनंत दापोसे (वय.३१), अजय शिवाजी मुंडे (वय.१९)रा. मडपवाडी खालापूर हे प्रवाशी जखमी झाले आहेत.जखमींना पाली प्राथमिक आरोग्य केंद्र व जोशी हॉस्पीटल पाली येथे उपचारासाठी नेण्यात अाले. या अपघाताचा पुढिल तपास पाली पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक स्वप्निल म्हात्रे करीत आहेत.

Web Title: accident of car and mini door auto