नशीब बलत्तर म्हणून वाचले ते दोघ नाहीतर.....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

अपघाताची भिषणता एवढी मोठी होती की अक्षरशः दुचाकिचा चक्काचूर झाला.

बांदा (सिंधुदुर्ग) : झाराप-पत्रादेवी महामार्गावर इन्सुली कोठावळे बांध येथे दोन दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये ‌प्रतिक उमेश राणे (१८, इन्सुली), शुभम नारायण पंडीत (२०, बांदा) हे युवक गंभीर जखमी झालेत.आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची भिषणता एवढी मोठी होती की अक्षरशः दुचाकिचा चक्काचूर झाला.

हेही वाचा- अंत्यसंस्कार चुकले तर रक्षाविसर्जनासाठी गर्दी
सविस्तर वाचा...

 

या अपघातामध्ये प्रतिक उमेश राणे वय वर्षे १८ रा. इन्सुली,शुभम नारायण पंडीत वय वर्षे २० रा. बांदा हे युवक गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी जखमींना त्वरीत बांदा प्राथमीक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. दोन्ही जखमींच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पंटवर्धन यांनी प्राथमिक उपचार करून जखमींना अधीक उपचारासाठी कुडाळ येथे पाठविण्यात आले. बांदा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident case in banda sindhudurg