वाकण पाली मार्गावर ऑईल सांडल्याने अपघात

अमित गवळे 
शुक्रवार, 22 मार्च 2019

पाली - वाकण पाली मार्गावर वजरोली गावाजवळील वळणावर रस्त्यावर शुक्रवारी (ता.22) सांडलेल्या ऑईलवरुन अनेक वाहने घसरून अपघात झाले. ऑईलवरुन घसरुन मोटारसायकलस्वार खाली कोसळून जखमी झाला. तसेच एका कारचा देखील घसरुन अपघात झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की वाकण पाली मार्गावर वजरोली गावाजवळील वळणावर रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणावर ऑईल साडले होते. रस्त्यावरुन येणार्‍या मोटारसायकलस्वारांना ऑईल सांडल्याचे लक्षात येण्याआधीच मोटारसायकलस्वार घसरुन पडत होते. मोटारसायकलस्वार घसरुन जखमी होण्याच्या घटना सुरु असताना पालीकडून चिपळूनकडे जाणार्‍या मारुती सुझुकी कारचालक संजय भोसले यांना रस्त्यावर पडलेल्या ऑईलचा अंदाज आला नाही. त्यामुळे ऑईलवरुन घसरलेल्या कारने दिशा बदलली. सुदैवाने समोरुन कोणतेही अवजड वाहन न आल्याने मोठी दुर्घटना झाली नाही. या अपघातात कारचे नुकसान झाले. ऑईलवरुन वाहने घसरत असल्याची बाब लक्षात येताच प्रवाशांनी जवळपासची माती आणून ऑईलवर टाकली. तसेच अपघातस्थळी काही तरुणांनी थांबून येणार्‍या जाणार्‍यांना ऑईल सांडले असून सावकाश जाण्याबाबत सूचना दिल्या. त्यामुळे अपघाती घटनांचे प्रमाण कमी झाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident due to oil on the wakan pali road