टायर फुटल्याने ट्रक उलटला, दोघे बचावले 

accident karul ghat konkan sindhudurg
accident karul ghat konkan sindhudurg

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - करूळ घाटात दिंडवणेनजीक टायर फुटल्यामुळे ट्रक पलटी झाला. सुदैवाने ट्रकचालक आणि त्याचा 9 वर्षीय पुतण्या या अपघातातुन बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातात ट्रक आणि ट्रकमधील मालाचे लाखो रूपयाचे नुकसान झाले. हा अपघात आज सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास झाला. 

पुणे येथून कणकवलीला सिमेंट पत्रे घेवून जात असलेला ट्रकचा (एम.एच 12,3645) करूळ घाटातील दिंडवणेनजीक पुढील टायर फुटला. त्यामुळे चालक गोरख दुर्योधन जगताप (वय 35) यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर ट्रक पलटी झाला. ट्रकचा बहुतांशी भाग दरीच्या दिशेने झुकल्यामुळे ट्रकमधील सर्व पत्रे दरीत कोसळले. चालक गोरख आणि त्यांचा पुतण्या ऐंश पोपट जगताप (वय 9) हे दोघे या अपघातातून सुदैवाने बचावले. या अपघातात त्या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींवर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले.

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com