दापोली खेड मार्गावर अपघातामध्ये पाच ठार

चंद्रशेखर जोशी
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

दाभोळ - दापोली खेड मार्गावरील नारगोली येथे सकाळी साडेसातच्या सुमारास डंपर व मॅक्सिमो गाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघात 5 जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचाारासाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल केले आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मेक्सिमो चालक संदीप शेलार हे गाडी क्र एमएच 08 एजी 2095 घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या डंपर क्रमाक एम 10 झेड 2520 याला धडक बसली. हा अपघात एवढा मोठा होता की मेक्सिमोमध्ये अडकलेल्या प्रवाशांना काढण्यासाठी पोलिसांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. या अपघातामध्ये मॅक्सिमोचा चालक संदिप शेलार हा जागीच ठार झाला. दापोली नगरपंचायतीचे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी मधुकर कांबळे, जयदिश पारतुले व मदिया शेख, ठेमीदा शेख  हे जागीच ठार झाले. 

निलेश पवार, आडेगावचा उपसरपंच संदीप पावसकर हे गंभीर जखमी असून या दोघांना मुंबईत केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर या परिसरात वाहतूक कोंडी झाल होती. 

Web Title: accident on Khed Dapoli road 5 dead