महाडमध्ये अपघात; एक जण ठार तर दोघे जखमी

Accident in Mahad One killed and two injured
Accident in Mahad One killed and two injured

महाड : मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळील राजेवाडी फाटा येथे भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेअकरा वाजता हा अपघात झाला.

रस्ता चौपदीकरणाच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात घडल्याचा आरोप करत परिसरातील नागरिक संतप्त झाले होते. राजेवाडा फाटा येथे महामार्गाचे चौपदीकरणाचो काम सुरु आहे. येथे चार रस्ते एकत्र येतात परंतु तशी सुरक्षा व्यवस्था येथे नाही. कोंडिवते गावातून महाडकडे निघालेले दुचाकीस्वारांना समोरुन येणा-या वापी येथून मडगावकडे चाललेल्या ट्रकने उडवले. बाजूला सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी ही दुचाकी खड्ड्यात पडली. त्यात शिवाजी सालेकर ( वय 50) हे जागीच ठार झाले तर सहप्रवासी लक्ष्मण सकपाळ ( वय 35) रा.कोंडिवत व ट्रकचालक उमेशकुमार मिश्रा ( वय 23) हे दोघे जखमी झाले आहेत.

जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातानंतर ग्रामस्थ संतप्त झाले होते. रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस धनंजय देशमुख, तालुका अध्यक्ष राजेंद्र कोरपे व स्वरुप खांबे घटनास्थळी दाखल झाले. रस्त्याचे काम करणा-या एल अँन्ड टी कंपनीकडून जोपर्यंत सुरक्षतेतेचे उपाय केले जात नाहीत तोपर्यंत काम करु दिले जाणार नाही, असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com