सांदोशी बोरिवली एस.टीला कोंझर जवळ अपघात, सात जखमी

सुनील पाटकर
गुरुवार, 26 जुलै 2018

महाड - महाड आगारातून सुटणारी सांदोशी बोरीवली या एस.टी बसला रायगड किल्ल्या जवळ कोंझर घाटात अपघात झाला. ही बस महाडकडे येत असताना बाजूपट्टी वरून बाजूला असलेल्या शेतात कलंडल्याने सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला मोठी दुखापत झाली नसली तरी सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जिओने खोदलेल्या बाजूपट्टीमुळे या भागात या पूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. 

सांदोशीहून बोरिवली बोरिवलीकडे जाण्यासाठी बस चालक ए.के.बनसोडे हे बस घेऊन येत असताना कोंझर घाटात बाजूपट्टी वर बस येताच कलंडली. चालक ही बस वेगाने चालवत असल्याने एस.टी.त बसलेल्या प्रवासी व विद्यार्थ्यांनी बस सावकाश चालवण्यासाठी चालकाला सांगितले होते. या बसमध्ये 38 प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये 15 विद्यार्थी देखील होते. हे सर्व विद्यार्थी कोंझर येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात येत होते. ही बस शेजारी असलेल्या भात शेतात कोसळल्याने प्रवाशांना दुखापत झाली नाही. एस.टी. बस मधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले असून यामध्ये सीताबाई रामचंद्र वालगुडे ( रा.खर्डी), लक्ष्मी गणपत महाडिक (रा.खर्डी), लक्ष्मण खोपडे (रा. खर्डी), धोंडू कुले (रा. पाचाड), सखाराम भोसले(रा. पाचाड), अंबिका पासलकर व गौरू देऊ गायकवाड (रा. पाचाड) यांचा समावेश आहे. या सातही जखमींना पाचाड ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.  अपघात होताच पाचाड आणि कोंझर गावातील स्थानिक ग्रामस्थ याठिकाणी मदतीला धावले. त्यांनी सर्व प्रवाशांना एस.टी.च्या खिडकीतून बाहेर काढले. महाड आगाराचे आगारप्रमुख ए.पी.कुलकर्णी आणि वाहतूक कंट्रोलर शिवाजी जाधव यांनी अपघातस्थळी जाऊन पर्यायी बसमधून विद्यार्थी आणि प्रवाशांना मार्गस्थ केले. महाड तालुक्यात जिओ या कंपनीच्या केबलसाठी रस्त्याच्या बाजूपट्टीचे खोदकाम केले होते. या खोदकामामुळे सातत्याने अपघात होत आहेत.

Web Title: Accident near Sangoshi Borivli ST, seven injured