पाली खोपोली मार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात

अमित गवळे
गुरुवार, 24 मे 2018

पाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात झाल्याचा फोन गुरुवारी (ता.२४) दुपारी पाली पोलीस स्थानकासह, पाली प्राथमिक अारोग्य केंद्र व तहसिल व पंचायतसमिती कार्यालयात अाला. यावेळी प्रसंगावधानता दाखवत पाचव्या मिनीटात पाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ तहसिल कर्मचारी, व पंचायत समितीची यंत्रणा देखील घटनास्थळी तातडीने पोहचली. परंतू प्राथमिक आरोग्य विभागातून रुग्णवाहीका अथवा आरोग्य कर्मचारी मात्र अपघातस्थळी पोहचले नाहीत. आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या तातडीच्या कॉलमध्ये आरोग्य यंत्रणा सपशेल फेल झाल्याचे यावेळी निदर्शनास आले..

रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या आदेशाने रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने गुरुवारी (ता.२४) हे अपघाताचे मॉक ड्रिल घेण्यात आले. यावेळी पाली खोपोली मार्गावर रोमिथ रेझिन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसमोर कंटेनर व कारचा भिषण अपघात झाल्याचा कॉल दुपारी तीन वाजता पोलीस व संबधित प्रशासकीय यंत्रणांना करण्यात अाला होता. तातडीने अपघातस्थळी पोहचलेल्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना घटनास्थळी पोहचल्यावर हे मॉक ड्रील असल्याची माहिती मिळाल्याने या सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र जर हा अपघात खरा असता तर वेळीच रुग्णवाहीकेसह तालुक्यातील आरोग्य यंत्रणा दक्ष नसल्याने अपघातग्रस्तांना कदाचीत आपले प्राण गमवावे लागले असते.

यावेळी नागरी संरक्षक दल रायगड सहाय्यक उपनियंत्रक एच.एम.भोईर, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख समाधान कडू,सहा. गटविकास अधिकारी एस.एस.कवितके, पो.हे.कॉ.एच.डी.पाटील, पो.ना. मनोज हंबीर, शशिकांत सानकर,पाली मंडळ अधिकारी गोविंद हरणे, पाली तलाठी विशाल चोरघे, राबगाव तलाठी नंदकुमार हिंदोळे, पं. स. शाखा अभियंता बि.ए.दत्तू आदिंसह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने हे मॉक ड्रील घेण्यात आले.आरोग्य सेवा वगळता इतर सर्व प्रशासकीय यंत्रणांनी यावेळी शीघ्र प्रतिसाद दिला. यामुळे सुधागड तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा मात्र त्वरीत प्रतिसाद मिळाला नाही.. यापुढे आरोग्य विभागाने अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे.

- समाधान कडू, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख रायगड

Web Title: accident on pali khopoli road between car and container