दाभोळे अपघातः वाढदिवसादिवशीच मित्र गेले सोडून

दाभोळे अपघातः वाढदिवसादिवशीच मित्र गेले सोडून

देवरूख - आपला वाढदिवस हा प्रत्येकासाठीच अविस्मरणीय असतो. मात्र हाच वाढदिवस बाहेर जाऊन साजरा करण्याची त्यांची उर्मी मृत्यूला अलिंगन देवून गेली. अंगावर काटा आणणारा हा क्षण सध्या पुण्यातील दुष्यंत वालगुडे अनुभवतोय. कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर दाभोळेत कारचा अपघात झाला आणि दुष्यंतचा वाढदिवस साजरा करण्याचं त्याच्या मित्रांचे स्वप्न अपुरंच राहिलं.

पुण्यातील एका ऑनलाईन कंपनीत काम करणार्‍या दुष्यंत वालगुडेचा आज वाढदिवस. मित्राचा वाढदिवस देवदर्शनाने साजरा करण्याचा प्लॅन दुष्यंतच्या पुण्यातील मित्रांनी आखला. अजय परदेसी, श्रीराम पाटील, अनिकेत पाटील, युवराज जाधव आणि सागर गांडले असे दुष्यंतचा वाढदिवस जल्लोषात साजरा कऱण्याच्या प्लॅनिंगने निघाले.

पुण्याहून मंगळवारी रात्री निघालेल्या या सर्व मित्रांनी दुष्यंतचा वाढदिवस गणपतीपुळे इथं साजरा करण्याचं योजलं होतं. मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होते. भल्या पहाटे कोल्हापूरातील महालक्ष्मीचे दर्शन घेवून गणपतीपुळ्याच्या दिशेने त्यांची गाडी सुसाट निघाली. साखरपा जवळच्या दाभोळे इथं दुष्यंतची गाडी झाडावर आपटली. आणि दुष्यंतचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या पाचपैकी दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. आपल्या वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन आपल्याच जिवाभावाच्या मित्रांना मृत्यूच अलिंगन देवून गेल्याचं दुःख सहन करत दुष्यंत आता रुग्णालयात उपचार घेतोय.

गाडीचा चक्काचूर झाला. यात युवराज जाधव आणि सागर गांडले हे दोघे मित्र कायमचे सोडून गेलेत. वाढदिवस साजरा करण्याचं स्वप्नं मागे राहिलंय. हे सर्व मित्र ऑनलाईन खाद्यपदार्थ घरोघरी पोहचवण्याचं काम करतात. एकाच संस्थेत ते कामाला आहेत. पण आता दररोज दिसणारे हे मित्र आपणाला दिसणार नाहीत. आपला वाढदिवसाच्या दिवशी हे दोन मित्र गमावल्याची बोच दुष्यंतला काम सलत रहाणार हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com