एसटी बसचा ब्रेक फेल होऊन अपघात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

सुधागड तालुक्यातील मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची ने-आण करणार्‍या एसटी बसचा मंगळवारी (ता.12) सकाळी साडेनऊच्या सुमारास ब्रेक फेल होऊन अपघात झाला.

पाली : सुधागड तालुक्यातील मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची ने-आण करणार्‍या एसटी बसचा मंगळवारी (ता.12) सकाळी साडेनऊच्या सुमारास ब्रेक फेल होऊन अपघात झाला. गोंदाव फाट्याजवील कसईशेत आदिवासीजवळ तीव्र वळणावर हा अपघात झाला. या अपघातात सु.ए.सोच्या आत्मोन्नत्ती विद्यामंदिर जांभुळपाडा शाळेत शिकणारे 14 विद्यार्थी व तीन प्रवाशी प्रवास करीत होते.

ही बस मंगळवारी (ता.12) सकाळी गोंदाववरुन परळी जांभुळपाड्याकडे येत होती. यावेळी कसई गावाजवळील एका तीव्र उतारावर बसचा ब्रेक फेल झाला. वाहनचालकाने यावेळी प्रसंगावधानता राखत एसटी बस नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी बस वळणावरुन खड्ड्यात अडकली. दरम्यान, या अपघातात 14 विद्यार्थी व तीन प्रवाशांचे सुदैवाने प्राण वाचले. अपघाती बस बाहेर काढण्यासाठी रमेश पाठारे व किशोर पाठारे यांनी घटनास्थळी पोहचून आवश्यक ते सहकार्य केले.  
 

Web Title: Accident of ST bus After Bus Breaks failure