दशावतारी कलावंताचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

वेंगुर्ले - वायंगणी-चोरव्हाळी येथील वळण रस्त्यावर एसटी-दुचाकीच्या धडकेत दशावतारी कलाकाराचा मृत्यू झाला. नारायण ऊर्फ बाळू सहदेव मुणनकर (वय ३५, रा. आवेरा, कुडाळ) असे त्यांचे नाव आहे. अपघात वायंगणी येथे घडला.

येथील बस स्थानकावरून चारच्या सुमारास चालक ए. जे. पांजरी मालवण आगाराची (एम. एच. १२- सी एच ७८७५) वेंगुर्ले-म्हापण-परुळे-देवली मार्गे मालवण बस घेऊन निघाले होते. वायंगणी गणपती मंदिरच्या पुढे चोरव्हाळी येथील वळणावर बसने समोरुन येणाऱ्या (एम. एच -०७- ए सी ५६३३) मोटारसायकला धडक दिली. यात मोटारसायकलचे तुकडे होत ती जवळच्या खोल व्हाळीत पडली.

मोटारसायकल चालक बाळू मुणनकर जागीच ठार झाले. बस चालकाने अपघातस्थळी गाडी न थांबविताच तशीच गाडी सुमारे ५० मीटर पुढे नेली. मुणनकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच चालकाने मालवणच्या दिशेने पलायन केले; मात्र त्या परिसरातील जागृत नागरिकांनी त्याला पकडून पुन्हा घटनास्थळी आणले.

या अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील व दशावतारी नाट्य मंडळातील कलाकारांनी गर्दी केली होती. मालवण एसटी आगाराचे अधिकारी उशिरापर्यंत घटनास्थळी आले नसल्याने ग्रामस्थांनी त्याठिकाणी एसटी महामंडळाच्या गाड्या अडवून धरल्या होत्या. मुणनकर सध्या खानोलकर दशावतार नाट्य मंडळामध्ये कार्यरत होते. त्यांच्या मागे आई, विवाहित बहिणी असा परिवार आहे. सहायक पोलिस निरीक्षक रुपाली गोरड तपास करीत आहेत.

चालक नशेत
येथील पोलिसांनी एसटी चालक अरविंद जनार्दन पांजरी (वय ३३) यांनी मद्यप्राशन केल्याच्या संशयावरून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. यावेळी त्यांनी मद्यप्राशान केल्याचा प्राथमिक अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. 

‘राजा’ हरपला
बाळू मुणनकर यांची खानोलकर दशावतार नाट्य मंडळात मुख्य राजाची भूमिका ते करायचे. याशिवाय त्यांची गोरखनाथाची भूमिका लोकप्रिय होती. दशावतारी दुनियेतील एका महत्त्वाच्या कलाकाराच्या अशा अचानक जाण्याने नाट्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Accidental death of Dashavatri artist