माणगावजवळ दापोली-चिंचवड शिवशाहीला अपघात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

माणगाव : दापोली आगारातून सकाळी पावणे अाठ वाजता सुटणाऱ्या दापोली-चिंचवड 'शिवशाही'ला माणगावजवळ मोठा अपघात झाला असून गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतात कोसळली. सदर घटना आज सकाळी अकराच्या सुमारास महाड- माणगाव महामार्गावर घडली. अपघात झाल्यानंतर गाडीचा चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती बसमधील प्रवाशांकडून मिळत आहे. अपघातानंतर पाच ते सात मिनिटात पोलिस घटनास्थळी हजर झाले आणि सर्व जखमी प्रवाशांना माणगावच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बसमध्ये एकतीस प्रवासी होते. 

राज्य सरकारकडून स्वस्त दरात सर्वांना वातानुकूलित बससेवा मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेली शिवशाही बस सेवा तिच्या अपघातांमुळे सातत्याने चर्चेत आहे. याआधीही राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी शिवशाही बसचे सातत्याने अपघात झालेले आहेत. शिवशाहीच्या बसपैकी काही बस या कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. या बसचा चालक हा कंत्राटदाराचा असतो. या ड्रायव्हरना पुरेसे प्रशिक्षण दिले जात नाही त्यामुळे त्यांच्याकडून बेजबाबदारपणे बस चालवली जाते असा दावा केला जात आहे.

आज झालेल्या अपघातातही चालक ओव्हरटेक करत असताना समोरून आलेले वाहन चुकविताना बस रस्त्याच्या विरुद्ध बाजूच्या शेतात जाऊन कोसळली अशी माहिती गाडीतल्या प्रवाशांकडून दिली जात आहे. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे शिवशाही बससेवा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्‍यता आहे. 

शिवशाहीचा सक्तीचा प्रवास ? 
शिवशाही बससेवा सुरू होण्याच्या आधी "हिरकणी' ही विनावातानुकुलित बस सेवा राज्यभर सुरू होती. ही सेवा प्रवाशांच्या पसंतीला उतरली होती. पण शिवशाही बस सेवा सुरू केल्यानंतर हिरकणी बस सेवा बंद करण्यात आली. शिवशाहीचे तिकीट साध्या हिरकणीपेक्षा पन्नास ते ऐंशी रुपयांनी जास्त असल्यामुळे प्रवाशांना सक्तीचा वातानुकूलित बसमधून सक्तीचा प्रवास करावा लागत आहे.

Web Title: Accidents in Dapoli-Chinchwad Shivshahi near Mangaon