Ratnagiri News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या; अखेर आरोपीला मरेपर्यंत फाशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court order

Ratnagiri News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या; आरोपीला मरेपर्यंत फाशी

अल्पवयीन मुलावर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी खेड जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. खेड तालुक्यातील सुकीवली गावातील चव्हाणवाडी येथे १९ जुलै २०१८ रोजी एका १४ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. यानंतर तिचा मृतदेह शौचालयातील पाण्याच्या टाकीत लपवण्यात आला होता.

या प्रकरणात सुर्यकांत चव्हाण या आरोपीला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. आज या प्रकरणात अतिरीक्त सत्र न्यायाधीश डि एल निकम यांनी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

या निकालानंतर खेडचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी गावकर्यांनीही सरकारी वकिलांचा सत्कार करून गौरव केला. या प्रकरणात सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद व सबळ पुरावे तपासून या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 45 वर्षानंतर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiri