No Mask No Entry: रत्नागिरीत 229 जणांवर कारवाई

Action against 229 in Ratnagiri covid 19 marathi update konkan news
Action against 229 in Ratnagiri covid 19 marathi update konkan news

रत्नागिरी :  कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या शासकीय निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍या 229 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून 1 लाख 66 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये शासनाने दुकाने उघडण्यावर बंदी घालत दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली होती. तरीही अत्यावश्यक काम नसताना विनाकारण फिरणार्‍या, मास्क न वापरणार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागातील पोलिस ठाण्यांनी ही कारवाई केली. रत्नागिरी शहर, ग्रामीण, पुर्णगड, जयगड, संगमेश्वर या पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्यासह  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोना बाधितांच्या संख्या आता तीनशे पार गेली आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. राज्यात हीच स्थिती असल्याने राज्य सरकारने नागरिकांवर काही निर्बंध घातले. आठ दिवसांपूर्वी शासनाने दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली होती. तर शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत संचारबंदी लागू केली होती. या कालावधित घराबाहेर पडणार्‍या व्यक्तीसह शासनाचे अन्य नियम धाब्यावर बसवून दुकाने उघडणे, विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणे अशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

रत्नागिरी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी आपल्या अखत्यारीत असलेल्या सर्व पोलिस ठाण्यांना शासनाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंबलबजावी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मिनी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून नियमांचा भंग करणार्‍या 29 जणांवर रत्नागिरी शहर, ग्रामीण, पुर्णगड, जयगड, संगमेश्वर या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यापार्यांसह व्यावसायिकांचा समावेश आहे.

मास्क बाबत जनजागृती करुनही मास्क न घालणार्‍या 220 नागरिकांना 1 लाख 10 हजारांचा दंड केला. तर 9 आस्थापनांना 56 हजारांचा दंड करण्यात आला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने निर्बंध घातले आहेत. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच निर्बंध लागू करण्यात आल्याने प्रत्येकाने नियमांचे पालन करावे व कारवाई टाळावी, असे आवाहन  वाघमारे यांनी केले आहे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com