मसुरे जुगार अड्डा प्रकरणी 10 संशयितांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

मालवण - तालुक्‍यातील मसुरे आंगणेवाडी येथे दत्तात्रय आंगणे यांच्या घरात सुरू असलेल्या तीन पत्ती जुगारावर छापा टाकून रंगेहाथ पकडलेल्या दहा संशयितांना आज येथील न्यायालयात हजर केले. त्या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी हजर करण्यात आले.

आंगणेवाडीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळताच त्यांनी काल सापळा रचून दत्तात्रय आंगणे यांच्या घरात छापा टाकला. यात अच्युत मनोहर प्रभू (मसदे), मुकुंद लाडोबा रावले (म्हापण-वेंगुर्ले), राजेंद्र भिवा चव्हाण (कुंभारमाठ), सदानंद संभाजी घाडीगावकर (चाफेखोल), शाहीद रहमान सय्यद (मसुरे), गुरुदास प्रभाकर पालव (वडाचापाट), रामचंद्र अर्जुन निकम (सुकळवाड), पुरुषोत्तम बाळकृष्ण शिंगरे (मसुरे), शरद सूर्यकांत पाटील (मसुरे), अजित गोविंद आंगणे (आंगणेवाडी) या दहा जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून 59 हजार 780 रोख रक्कम, 15 हजार 800 रुपयांचे भ्रमणध्वनी, 1 हजार रुपयांच्या खुर्च्या, 1200 रुपयांची टेबल्स, 600 रुपयांचे अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हा अन्वेषणाचे विश्‍वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, श्री. आंबेरकर, गुरुनाथ कोयंडे, प्रसाद सावंत, अरविंद धुरी, संतोष सावंत, मसुरे दूरक्षेत्राचे महेश देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.

Web Title: Action against gamblers