महाडमध्ये प्लास्टिकविरोधात धडक मोहिम

महाडमध्ये प्लास्टिकविरोधात धडक मोहिम

महाड : प्लास्टिक पिशव्यांसह नॉन-ओव्हन बॅगविरोधातही सरकारने बंदी टाकली आहे. मात्र, या पिशवीला परवानगी आहे, असा खोटा प्रचार करत या पिशव्या बाजारात सर्रास वापरली जात होती. याबाबत आज महाड नगरपरिषद आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने धडक मोहीम आखली. या मोहीमेत बाजारपेठेत दुकानदारांकडून प्लॅस्टिक व नॉन ओव्हन पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर सहा व्यापाऱ्यांवर तीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय कामकाजात अडथळे आणल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागाने प्लास्टिक पिशवी बंदीचा निर्णय घेतला आहे. केवळ प्लास्टिकच नव्हे तर थर्माकोल, प्लास्टिक नॉन ओव्हन बॅग यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र या प्लास्टिक नॉन ओव्हन बॅग बाजारात व्यापारी आपला माल देण्याकरीता सर्रास वापर करत असल्याचे समजताच महाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सागर आवटी, अभियंता सुहास कांबळे, किशोर शिंदे, मंगेश जगताप यांनी महाड बाजारपेठेत धडक मोहीम आखून दुकानदारांकडून प्लास्टिकसह थर्माकोल, प्लास्टिक ओव्हन बॅग जप्त केल्या आहेत.

आज दुपारी महाडमधील शिवाजी चौक येथून या मोहीमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी आपल्याकडील नॉन ओव्हन बॅगा स्वतःहून अधिकाऱयांकडे दिल्या. मात्र, काही विक्रेत्यांनी हुज्जत घालण्यास सुरवात केली. अशांवर दंडात्मक कारवाई तर दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. महाड बाजारपेठेत दुकानदार, हॉटेल व्यवसायिक, मिठाई विक्रेते, फळ विक्रेते या प्लास्टिक ओव्हन बॅगा सर्रास वापर करत असल्याचे जप्त केलेल्या पिशव्यांवरून उघड होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com