पालीत गावठी दारु विक्रेत्यावर कारवाई

अमित गवळे
सोमवार, 16 जुलै 2018

सुधागड तालुक्यातील मढाळी आदिवासीवाडी येथे गावठी दारु विक्री करणार्‍यास पोलिसांनी नुकतेच पकडले आहे. त्याबरोबर गावठी दारु व इतर साहित्य देखील जप्त केले आहे.

पाली - सुधागड तालुक्यातील मढाळी आदिवासीवाडी येथे गावठी दारु विक्री करणार्‍यास पोलिसांनी नुकतेच पकडले आहे. त्याबरोबर गावठी दारु व इतर साहित्य देखील जप्त केले आहे.

बाबू गंगाराम वाघमारे रा. रेल्याची वाडी हा मढाळी आदिवासीवाडीत विनापरवाना गावठी दारु विक्री करीत होता. पाली पोलीसांनी टाकलेल्या धाडीत प्रत्येकी 20 लिटरचे 3 कॅनमधून 60 लिटर 2400 रुपये किमतीची गावठी दारु विक्री करीत असताना वाघमारे याला पकडले.

पाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. प्रफुल चांदोरकर, पो.ह. गजानन म्हात्रे, पो. ना. राहूल बांद्रे, पो.ना. महेश लांगी आदिंनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. गजानन म्हात्रे हे करीत आहेत.

Web Title: Action on the Alcohol Supplier