रत्नागिरी किनाऱ्यावर तीन परप्रांतीय बोटीवर कारवाई

राजेश कळंबटे
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

रत्नागिरी - बांगडा, म्हाकूल साठी रत्नागिरीच्या किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या कर्नाटक येथील 3 बोटींवर मत्स्य विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. पथकाचा सुगावा लागल्यानंतर 7 ते 8 बोटी जाळी सोडून पळून गेल्या.
मिरकारवाडा बंदरापासून 16 वाव अंतरात काही परराज्यातील मासेमारी ट्रोलर्स मासेमारी करत होते.

बांगडा मासा मिळू लागल्यामुळे या बोटी रत्नागिरी किनारी आल्या आहेत. गेले आठ दिवस मत्स्य विभागाची गस्ती नोका माऊलीसाई त्या नोकांवर लक्ष ठेवून होती. दोन दिवसापूर्वी समुद्रात पाठलागही केला. मात्र त्या नोका पळून गेल्या. आज मासेमारी करताना पोलीस सुरक्षा विभागाच्या दोन बोटीच्या सहकार्याने कारवाई करण्यात आली. मिरकारवाडा येथे जयवैष्णवी ही कर्नाटकातील बोट पकडण्यात आली. त्यावरील 1 टन मासळी जप्त केली आहे. त्यात बांगडा, म्हाकूळ मासा होता.
या पथकाने जयगड जवळ 2 कर्नाटकी बोटी पकडल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. सहायक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली आबा साळुंके, पी डी सावंत, परेश यांच्यासह सुरक्षा पोलिसांचा सहभाग होता

परराज्यातील नोकांवर कारवाईसाठी गेले काही दिवस प्रयत्न सुरु आहेत. त्यात आज यश आले. यापुढेही पोलिसांच्या मदतीने कारवाई सुरु राहील.
- आनंद पालव,
सहायक मत्स्य आयुक्त

Web Title: Action on three parasitic boats on the Ratnagiri coast