प्रदुषण प्रश्नी लोटेतील योजना इंडस्ट्रीज, वनविडवर कारवाई 

Action On Yogana Industries Vanvid In Lote On Pollution Issue
Action On Yogana Industries Vanvid In Lote On Pollution Issue

खेड ( रत्नागिरी ) - तालुक्‍यातील औद्योगिक वसाहतीतील आवाशीनजीकच्या नाल्यात टॅंकरमधून घातक रसायन ओतल्याप्रकरणी योजना इंडस्ट्रीज व वनविड या दोन कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयाने दिले आहेत. 

महामार्गावरील असगणी - लवेलनजीक घातक रसायन ओतण्याचे प्रकार वाढीस लागले होते. याबाबत ग्रामस्थांनी सातत्याने तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळा करण्यात येत होता. अखेर ग्रामस्थांनीच जागता पहारा ठेवत आवाशीनजीकच्या नाल्यात घातक रसायन ओतणारे दोन टॅंकरचालक रंगेहाथ पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. हे दोन्ही टॅंकर योजना इंडस्ट्रीज व वनविड कंपनीचे असल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानुसार या दोन्ही कंपन्यांचे उत्पादन बंद करण्याबाबतचा प्रस्ताव चिपळूण येथील उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयाकडे पाठवला होता. या दोन्ही कंपन्यांचे उत्पादन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय कदम यांनी आक्रमक भूमिका घेत 3 डिसेंबरपर्यंत उत्पादन बंद करण्याची डेडलाईन दिली होती. 

अखेर या दोन्ही कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. त्यानुसार महावितरणकडून दोन्ही कंपन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला असून एमआयडीसी कार्यालयाकडून पाणीपुरवठाही बंद करण्यात आल्याची माहिती चिपळूण येथील प्रदूषण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी चव्हाण यांनी दिली. 

नमुने सांडपाण्याशी जुळणारे 
असगणी येथील काही युवकांना 12 नोव्हेंबरला असगणी फाट्यानजीकच्या नाल्यामध्ये घातक रसायन फेकल्याचे निदर्शनास आले होते. तेथील युवकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले होते. अधिकाऱ्यांनी नाल्यातील पाण्याचे नमुने घेऊन ते लोटे औद्योगिक वसाहतीतील कोणत्या रासायनिक कारखान्याच्या सांडपाण्याशी जुळणारे आहेत हे तपासणीसाठी नेले होते. दोन दिवसांनंतर नमुने लोटेतील कोणत्याच रासायनिक कारखान्याच्या सांडपाण्याशी जुळत नसल्याचे सांगितले. त्यानंतर रंगेहाथ पकडलेल्या टॅंकर चालकांनी नाल्यात फेकलेले रसायन लोटे औद्योगिक वसाहतीतील योजना आणि वनविड या रासायनिक कारखान्यांतील असल्याचे सांगितले. 

कशेडीत घडलेला प्रकार 
गेल्या महिन्यात कशेडी घाटात वाहत्या ओढ्यामध्ये केमिकल सोडले होते. या ओढ्यालगत नळपाणी योजनांचे पाणी खराब झाले होते. नदीतील मासे आणि जलचर मेल्याने तेथील ग्रामस्थांनी आंदोलन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com