रेल्वेच्या विश्रामगृहावरील भेट सुखद : ॲड. पाटणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - कोकण रेल्वे प्रकल्पाच्या राष्ट्रार्पण सोहळयाला म्हणजे १ मे १९९८ ला तत्कालीन पंतप्रधान अटलजी आले होते. तेव्हा रेल्वेच्या विश्रामगृहावर त्यांची सुखद भेट झाली. आज त्या आठवणी ताज्या झाल्या की उर भरून येतो. अटलजींच्या जाण्याने राजकारणातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावनाविवश प्रतिक्रिया ॲड. विलास पाटणे यांनी देत आठवणींना उजाळा दिला. 

अटलजींची अनेक वेळा भेट झाली. चिपळूणला कॉलेजला असताना सभेच्या दुसऱ्या दिवशी प्रेमजीभाई आसर यांचे घरी तसेच रत्नागिरीमधील स्वागतानंतर विश्रामगृहात झालेल्या भेटीचे क्षण माझ्या डोळ्यासमोर तरळत आहेत. १ मे १९९८ ला कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्रार्पण करण्याकरीता पंतप्रधान अटलजी आले होते. तेव्हा रेल्वेच्या विश्रामगृहावर त्यांची भेट झाली. एप्रिल १९९५ मध्ये गोव्यातील मांडवी हॉटेलमध्ये पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी चालू होती. मुलाखतीसाठी विनंती केली असता कोणतेही आढेवेढे न घेता अन्य जागा उपलब्ध नसल्याने हॉटेलच्या गच्चीवरच्या बाकावर बसून पाऊण तास मुलाखत दिली.

अटलजींच्या साधेपणाने मी भारावून गेलो. प्रखर राष्ट्रभक्ती मुल्यांवर श्रद्धा, विचारावर निष्ठा, कुशल संघटक, अमोघ वक्तृत्व, दूरदर्शी नेतृत्व हे अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाचे आयाम दीर्घकाळ लक्षात राहतील. १९६८ साली जनसंघाचे अध्यक्ष, १० वेळा लोकसभा २ वेळा राज्यसभेचे खासदार, संसदेतील विरोधी पक्षनेते, ३ वेळा पंतप्रधान पद भूषविल्यानंतरही अटलजींचे स्वतःच्या मालकीचे घर नाही, ग्वालियरचे घर लायब्ररीला देऊन मोकळे झाले.

Web Title: Ad Vilas Patne Atal Bihari Vajpayee Memory