आता पाठलाग नाही, थेट घरी येणार नोटीस

राजेश शेळके
रविवार, 12 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - धूम स्टाईलने दुचाकी चालवून पळणार असाल आणि फॅन्सी नंबर प्लेट गाडीला असेल तर...सावधान. पोलिस तुमच्या मागे लागणार नाहीत; नोटीस थेट चालकाच्या घरी  येणार आहे. ॲप आणि सीसीटीव्हीचा वापर करून ही नवी संकल्पना राबविण्याचा निर्णय झाला आहे. 

रत्नागिरी - धूम स्टाईलने दुचाकी चालवून पळणार असाल आणि फॅन्सी नंबर प्लेट गाडीला असेल तर...सावधान. पोलिस तुमच्या मागे लागणार नाहीत; नोटीस थेट चालकाच्या घरी  येणार आहे. ॲप आणि सीसीटीव्हीचा वापर करून ही नवी संकल्पना राबविण्याचा निर्णय झाला आहे. 

वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल विभूते म्हणाले, ‘‘शहरात धूम स्टाईलविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली. मात्र त्याला प्रतिबंध घालण्यास तेवढे यश आले नाही. मुख्य रस्ता असो वा अंतर्गत रस्ते, त्यातून वाट काढत धूम स्टाईलने तरुण निघून जातात. ही क्रेज कमी झालेली नाही. त्यासाठी पोलिस वेगळ्या पद्धतीने हा विषय हाताळणार आहेत. 

फॅन्सी नंबर प्लेटचाही विषय तसाच आहे. आरटीओ असो वा वाहतूक पोलिस यांच्या कारवाईची तमा न बाळगता नंबर प्लेटवर ४१४१ ला ‘दादा’, राजा, मामा, उदय अशा नावाचे फॅन्सी नंबर आहेत. धूम स्टाईलने जाणाऱ्याचा वाहतूक पोलिस पाठलाग करतात किंवा फॅन्सी नंबर प्लेटवाल्याला शिटी मारून थांबवतात. काहीवेळा दुचाकीस्वार पळून जातात. पोलिसांना शक्‍य झाले तर त्यांचा पाठलाग होतो. 

आता पोलिस अशांच्या मागे लागत बसणार नाहीत. पोलिस सीसीटीव्हीरून आणि ॲपद्वारे अशा वाहनधारकांचा शोध घेऊन त्यांच्या पत्त्यावर थेट नोटीस पाठविणार आहेत. वाहतूक पोलिसांनी त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. येत्या काही दिवसांत शहरामध्ये ही कारवाई सुरू होणार आहे. 

धूम स्टाईल आणि फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्यांच्या मागे पोलिस लागणार नाहीत. ॲप आणि सीसीटीव्हीद्वारे दुचाकीधारकांना शोधून त्यांच्या घरी नोटीस पाठवणार आहे.
- अनिल विभूते,
वाहतूक पोलिस निरीक्षक

Web Title: advance technique used in traffic control office