सावधान ; तापाचे आजार फैलावताहेत

after coronavirus disease increased in ratnagiri include various fever in ratnagiri
after coronavirus disease increased in ratnagiri include various fever in ratnagiri

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत लेप्टोचे १२ रुग्ण, मलेरिया १७ रुग्ण, डेंगी २१ तर माकडतापाचे ४१ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी लेप्टोसदृश एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना महामारीची साथ उद्‌भवली असताना आता अन्य साथीच्या आजाराचे रुग्ण सापडू लागले आहेत. जानेवारीपासून जिल्ह्यात एकूण लेप्टोचे १२ रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये १५ ऑक्‍टोबरनंतर भात कापणी हंगामात तीन रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी जांभवडे येथील एका रुग्णाचा लेप्टोने मृत्यू झाल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्यात जानेवारीपासून सापडलेल्या लेप्टोच्या १२ रुग्णांपैकी वैभववाडी तालुक्‍यात १, कणकवली २, कुडाळ १, देवगड ०, मालवण १, वेंगुर्ले १, सावंतवाडी २ तर दोडामार्ग तालुक्‍यातील ४ रुग्णांचा समावेश आहे.

जानेवारीपासून मलेरियाचे एकूण १७ रुग्ण सापडले आहेत. डेंगूचे २१ रुग्ण तर माकडतापाचे ४१ रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये १५ ऑक्‍टोबरनंतर भात कापणी हंगामात सापडलेल्या मलेरीया १ व डेंगीच्या एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती देतानाच जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण नाही, असे डॉ. खलिपे यांनी स्पष्ट केले. 

डॉ. खलिपे म्हणाले, ‘‘सद्यस्थितीत भात कापणीचा हंगाम सुरू असून लेप्टोच्या रुग्णात वाढ होण्याची शक्‍यता आहे. डिसेंबरनंतर माकडताप या आजाराची साथ वाढण्याची शक्‍यता आहे. यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत आवश्‍यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. लेप्टोच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी लेप्टो प्रतिबंधक (डोक्‍सिसायक्‍लीन) गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना महामारीची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आता लेप्टो, डेंगू, मलेरीया, माकडताप या साथीचा फैलाव होऊन रुग्ण सापडू लागले आहेत. याबाबतची खबरदारी घेण्यात येत आहे तर जास्तीत जास्त रक्तनमुने तपासणीचे काम करण्यात येणार आहे.’’ 

रक्त नमुने तपासून घ्या 

जिल्ह्यात कोरोनाच्या साथीबरोबरच आता लेप्टो, डेंगी, हिवताप, माकडताप यासारख्या साथीचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोणताही ताप आल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन कोरोनाच्या चाचणी बरोबरच रक्त तपासणी करून घ्यावी. जेणेकरून आलेला ताप कोणत्या प्रकारचा आहे याचे निदान करणे व उपचार करणे शक्‍य होईल. तरी जिल्हा वासीयांनी साथ रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com