आंबेनळी अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग

सुनील पाटकर
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

महाड : आंबेनळी घाटातील अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला आता जाग आली असुन घाटातील अपघातस्थळ व परिसरातील 580 मिटर अंतरामध्ये क्रॅश बरियर्स लावण्याचे काम सुरु झाले असुन 150 मिटर क्रॅश बरियर्स बसवण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणाहून बस दरीत कोसळली तेथे कोणतेही संरक्षक कठडे नसल्याची बाब पुढे आल्याने बांधकाम विभागाने तातडीने हे काम हाती घेतले आहे.

दापोली येतील कृषी विद्यापिठातील कर्मचा-यांची बस आंबेनळी घाटात दरीत कोसळून तीस जणांचा मृत्यु झाला.सकाळने घाटातील सुरक्षेवर बातमीही प्रसिध्द केली होती. ज्या ठिकाणी अपघात झाला तो रस्ता सरळ व रुंद असला तरीही तेथे कोणतेही संरक्षक कठडे नसल्याचे स्पष्ट झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची धावपळ सुरु झाली. या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही येथे भेटी दिल्या त्यानंतर येथे तात्पुरते बांबुचे रेलिंग बसवण्यात आले होते. असे रेलिग बसवल्याचा निषेध करणारा फलक त्या बाजुला मनसेने लावला होता. या घाटातील रस्ता व क्रॅश बरियर्स बसवण्याचे काम एप्रिल महिन्यात देण्यात आले होते. ठेकेदाराने रस्ता पूर्ण केला व क्रॅश बरियर्सचे काम केवळ खड्डे खणून तसेच ठेवले होते. ते वेळेत पूर्ण झाले असते तर अपघाताताचे चित्र वेगळे असते. तीस जणांचे बळी गेल्यानंतर आता येथे  क्रॅश बरियर्स बसवण्यात आले आहेत. घाटात विविध ठिकाणी 580 मिटर लांबीचे क्रॅश बरियर्स बसवले जात आहेत.

आंबेनळी घाटात अपघातस्थळी क्रॅश बेरियर्स बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे उर्वरित ठिकाणी 580 मिटर अंतरामध्ये हे काम केले जाणार आहे. 
- डी. आर. लवटे ( कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,पोलादपूर)
 
Web Title: After the incident, the Public Works Department was awakened