पेयजल योजनांचे भूमिपूजन पावसानंतर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

अंदाजपत्रकात तांत्रिक त्रुटी - प्रशासकीय मंजुरीचे प्रस्ताव उशिरा

रत्नागिरी - मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील नऊ पाणी योजनांना मान्यता देण्यात आली होती. अंदाजपत्रकातील तांत्रिक चुकांमुळे या योजनांच्या प्रशासकीय मंजुरीचे प्रस्ताव उशिराने पाठविण्यात आले आहेत. राज्यातील अनेक योजनांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकाचवेळी होणार आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश नाही. आठ योजनांसाठी सुमारे आठ कोटी मंजूर असून, त्यांचा नारळ पावसाळ्यात फुटण्याची शक्‍यता आहे.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेऐवजी शासनाने मुख्यमंत्री पेयजल योजना हाती घेतली. त्याचे निकषही बदलण्यात आले. एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांचा त्या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ गावांसाठी योजना राबविली जाणार आहे. त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले होते. सुरवातीला अंदाजपत्रक तयार करून पाठविले. त्यात तांत्रिक त्रुटी आढळल्याने ते प्रस्ताव माघारी पाठविले.

कुवारबाव योजनेसाठी २ कोटी ४१ लाख रुपये लागणार आहेत. त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे अधिकार आयुक्‍तस्तरावर असल्याने ते तिकडे पाठविले आहेत. खेड तालुक्‍यातील नांदगाव-दिवाळवाडी योजनेसाठी २ कोटी ३० लाख रुपये मंजूर होते; परंतु नवीन अंदाजपत्रकामध्ये मंजूर निधीत घट होणार आहे.

सहा योजनांचे अंदाजपत्रक तयार असून ते प्रशासकीय मंजुरीसाठी शासनाकडे पाठविले आहेत. एक महिन्यामध्ये त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर निविदा प्रक्रिया केली जाईल. तोपर्यंत पावसाळा सुरू होणार आहे. 

या कालावधीत काम सुरू करता येणार नाही. प्रत्यक्षात कामे करण्यासाठी ऑक्‍टोबर उजाडणार आहे. मुख्यमंत्री पेयजलमधील निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या योजनांचा प्रारंभ मुख्यमंत्री एकाचवेळी मंत्रालयात बसून करणार आहेत. ई-प्रणालीद्वारे हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. रत्नागिरीतील योजनांची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नसल्याने त्यांचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे.

Web Title: After the rainy season of the wet water scheme