आंगणेवाडी यात्रा 2 मार्चला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

मालवण : नवसाला पावणारी देवी म्हणून श्रद्धा असलेल्या आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडीची यात्रा 2 मार्चला होणार आहे. आज सकाळी भराडी देवी मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली. यंदा प्रथमच कुणकेश्‍वर यात्रेनंतर भराडीदेवीची यात्रा होणार आहे.

नवसाला पावणारी देवी म्हणून राज्यभरात श्रद्धा असलेल्या भराडी देवीच्या यात्रेची तारीख कधी जाहीर होणार याकडे भाविकांचे लक्ष लागले होते. मधल्या काळात सोशल मीडियावरून यात्रेच्या तारखेवरून अफवा पसरविण्यात आली होती.

या वेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने या अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे स्पष्ट केले होते. देव दिवाळीनंतर मंदिरात धार्मिक विधींना सुरवात झाली होती. डुकराची पारध झाल्यानंतर धार्मिक कार्यक्रमही गेल्या दोन दिवसांत झाले. आज सकाळी मंदिरात डाळप विधी पार पडल्यानंतर यात्रेची तारीख निश्‍चित करण्यात आली.

Web Title: aganewadi yatra on 2 march