आगरी शाळा झाली डिजिटल

अमित गवळे 
सोमवार, 7 मे 2018

पाली (रायगड) - आगरी शाळेला सर्वच स्थरातून  उत्तमप्रतिसाद मिळत आहे. या शाळेचे चौथे सत्र  शनिवारी (ता.५) व रविवारी (ता.६) ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कशेळी येथील मराठी शाळेत संपन्न झाले. या शाळेतील प्रशिक्षणार्थींना व्हिडीओ कॉलद्वारे थेट दुबईवरुन मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे बोली भाषेची ही शाळा आता डिजिटील व तंत्रस्नेही देखिल झाली आहे.

पाली (रायगड) - आगरी शाळेला सर्वच स्थरातून  उत्तमप्रतिसाद मिळत आहे. या शाळेचे चौथे सत्र  शनिवारी (ता.५) व रविवारी (ता.६) ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कशेळी येथील मराठी शाळेत संपन्न झाले. या शाळेतील प्रशिक्षणार्थींना व्हिडीओ कॉलद्वारे थेट दुबईवरुन मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे बोली भाषेची ही शाळा आता डिजिटील व तंत्रस्नेही देखिल झाली आहे.

आगरी बोली प्रचार व प्रसाराच्या संवर्धनाच्या उद्देशार्थ युवा साहित्यिक सर्वेश तरे यांच्या संकल्पनेतून ‘आगरी शाळा’ हा अभिनव उपक्रम सर्वांसाठी मोफत सुरु झाला. या कार्यशाळचे विशेष म्हणजे या सत्रा दरम्यान दुबईमध्ये अभियंता म्हणून काम करणारे मंगेश पाटील थेट दुबईवरून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सत्रात सहभागी झाले होते. दुबईमध्ये असून देखील मंगेश पाटील आवर्जून आपली बोली बोलतात. त्यांनी आगरी भाषेचा व्हिडीओ ब्लॉग तयार केला आहे. मंगेश पाटील ‘दुबईकर दादुस’ या नावाने सोशलमिडियावर प्रसिध्द आहेत.

शनिवारी (ता.५) प्रा.सदानंद पाटील यांनी आगरी बोली जडण-घडण विषयीचे सत्र घेतले. त्यात त्यांनी 'आगरी बोली मुळत: शुध्द बोली असून, तिचा प्रसार माध्यमातला चुकीचा वापर थांबला पाहिजे असे सांगीतले. त्या नंतर दुसरे सत्र मोरेश्वर पाटील यांनी 'आगरी भाषेचे मुळ' या विषयी घेतल. आगरी भाषा फार पूरातन बोली आहे हे बुचर आईसलँड (Butcher island)’ नावाच्या घारापूरी बेटाजवळील 'आगर भूमितील' अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे व वेगवेगळ्या शिलालेखांचे दाखले देत सांगीतले.

रविवारी (ता.६) उरणहून ज्येष्ठ साहित्यिक प्रा.एल.बी.पाटील आले होते. त्यांनी आगरी साहित्याचे दाखले देत परेन जांभळे, शंकर सखाराम यांची आवर्जून आठवण काढली. आगरी बोलीत पौरहित्य करण्याऱ्या धवलारीन यांचे मौखिक स्वरुपातील साहित्य जर का पुस्तकरूपात छापले असते, तर जगातील सगळ्यात जास्त लेखिका आगरी समाजातल्या ‘धवलारीनी’ असत्या असे प्रा.एल.बी पाटील म्हणाले. आगरी शाळेचे पुढील सत्र १२-१३ मे तसेच १९-२० मे रोजी ४ ते ६ या वेळात कशेळी येथे आहे. या मोफत आगरी शाळेत कुणाला सहभाग घ्यायचा असेल तर ९०९६७२०९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

''आपली बोली भाषा जर का मी विदेशात बोलून प्रसिध्द होऊ शकतो तर, आपल्या माणसांनी नक्कीच आपल्या भागात आपली बोली बोलायला पाहिजे'' असे मत मंगेश पाटील यांनी व्यक्त केले. तसेच आगरी शाऴेत सर्वांनी सहभागी व्हा यासाठी आवाहन केले.

Web Title: Agari school turned digital