आघाडीबाबत राणेंशी बोलून मार्ग काढू - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

कणकवली - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादीतर्फे त्यांचा गोवा येथे भेट घेऊन सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक काँग्रेससोबत आघाडी करून लढण्याच्या सूचना देतानाच आघाडीबाबत नारायण राणेंशी आपण स्वतः बोलून मार्ग काढू, असे श्री. पवार यांनी सांगितले. 

जिल्हा राष्ट्रवादीतर्फे गोवा येथील हॉटेल ग्रॅंड हयात येथे श्री. पवार यांची भेट घेतली. या वेळी जिल्हाध्यक्ष व्हिक्‍टर डान्टस, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, महिला जिल्हाध्यक्ष नम्रता कुबल, जिल्हा सरचिटणीस राजेश पाताडे, प्रदेश प्रतिनिधी सुभाष सावंत, सावंतवाडी तालुका अध्यक्ष भाई भाईप, उपाध्यक्ष उदय भोसले, सत्यजित धारणकर, गुरुदत्त कामत, उल्हास गावडे, इम्रान शेख, निशिकांत कडूलकर, गणेश चौगुले, अमित केतकर, संदीप राणे, रेवती राणे, उपसभापती आर. के. सावंत, नंदू मांजरेकर, अमोल ओरसकर, श्री. फ्रान्सिस, पप्पू जाधव आदी उपस्थित होते. 

या वेळी जिल्हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढविण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

Web Title: aghadi discussion with sharad pawar & narayan rane