इकोसेन्सिटीव्ह विरोधात दोडामार्गात 10 रोजी मोर्चा 

इकोसेन्सिटीव्ह विरोधात दोडामार्गात 10 रोजी मोर्चा 

दोडामार्ग - येथील तहसील कार्यालयावर 10 ला दोडामार्ग बचाव मंचाच्यावतीने इकोसेन्सिटीव्ह विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी उद्या (ता. 9) येथील सिद्धिविनायक मंदिरात बैठक होणार आहे. 

मोर्चातून तालुक्‍यातील सर्व गावामधुन शेतकरी आपला संताप व्यक्त करणार असल्याची माहिती सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई आणि तालुकाध्यक्ष प्रवीण गवस यांनी दिली. 

वनशक्ती फाऊंडेशनच्यावतीने दयानंद स्टॅंलिन यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन केंद्र सरकार राज्य सरकार व वन विभाग यांना दोडामार्ग तालुक्‍यामध्ये झाड/वृक्ष तोड करण्यास मनाई आदेश दिला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेशाचा भंग होईल असे कोणतेच कृत्य आपले कार्यक्षेत्रात घडु नये याची माहिती आपले मार्फत ग्रामस्थांना द्यावी अशी पत्रे सर्व ग्रामपंचायत यांना मिळाली. त्यामुळे भविष्यात गावातील शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणींवर सरपंच सेवा संघाने सर्व गावागावात जाऊन जनजागृती केली. सरपंच यांनी आपणास असलेल्या विशेष अधिकाराचा उपयोग करुन भविष्यातील निर्बंधातून आपल्या गावात अशाप्रकारचे जाचक अटी नको म्हणून ग्रामसभा घेतल्या.

बहुतेक ग्रामसभेचे ठराव इकोसेन्सिटीव्ह नको अशा प्रकारचे असल्याने ह्या जाचक अटीतुन मुक्तता व्हावी, म्हणून इकोसेन्सिटीव्ह विरोधी दोडामार्ग बचाव मंच स्थापन केला. त्याच्या माध्यमातून सकाळी 10 वाजता दोडामार्ग-तिराळी मार्गावरील सिद्धिविनायक मंदिरात येथे सर्व शेतकरी, आजी माजी लोकप्रतिनिधी, पंचायत समिती, जिल्हा परिष सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, लाकूड व्यावसायिक शेतकरी, गौणखनिज धारक शेतकरी यांनी जमावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

मोर्चा सकाळी साडे दहा वाजता गणेश मंदिर येथून दोडामार्ग तहसील कार्यालय येथे जाऊन तहसीलदारां मार्फत शासनाला निवेदन देऊन संपणार आहे. तरी सर्वानी वेळेत उपस्थित रहावे व मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन इकोसेन्सिटीव्ह विरोधी दोडामार्ग बचाव मंचने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com