इकोसेन्सिटिव्ह विरोधात दोडामार्ग तहसीलवर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

दोडामार्ग - तालुका सरपंच सेवा संघ आणि इकोसेन्सिटिव्ह विरोधी दोडामार्ग बचाव मंचाने तहसिलवर काढलेल्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक गावातून शेकडो ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते. दोडामार्ग-साटेली भेडशी मार्गावरील सिद्धिविनायक मंदिरातून मोर्चाची सुरवात झाली.

दोडामार्ग - तालुका सरपंच सेवा संघ आणि इकोसेन्सिटिव्ह विरोधी दोडामार्ग बचाव मंचाने तहसिलवर काढलेल्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक गावातून शेकडो ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते. दोडामार्ग-साटेली भेडशी मार्गावरील सिद्धिविनायक मंदिरातून मोर्चाची सुरवात झाली.

तालुक्यात वन विभागाने सरसकट वृक्षतोड बंदी घातली आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिकेनंतर इकोसेन्सिटिव्ह झोन जाहीर होण्याची शक्यता आहे. याचा सर्वात मोठा धसका तालुक्यातील काळ्या दगडाच्या खाणी, क्वॉरी आणि क्रशर चालवणार्‍या व्यावसायिकांसह लाकूड आणि चिरेखाण व्यावसायिकांनी घेतला आहे.

दुसरीकडे दोडामार्ग तालुका सरपंच सेवा संघाने गावागावात जात इकोसेन्सिटिव्ह झोन लागू झाल्यास काय दुष्परिणाम होतील, याबाबत जनजागृती केली आणि शासनापर्यंत विरोधाची धार पोचावी, यासाठी आजच्या मोर्चाचे आयोजन केले. तालुक्यातील सुमारे 50 टक्के ग्रामपंचायतींनी इकोसेन्सिटिव्ह झोन लागू करण्यास विशेष ग्रामसभा घेऊन ठरावाद्वारे विरोध दर्शवला आहे. त्याच पार्श्वभुमीवर आयोजित मोर्चाला त्या गावातील महिला पुरुषांनी मोठी हजेरी लावली.

पर्यावरणवादी याचिकाकर्ते स्टॅलीन दयानंद यांनी पत्रकार परिषद घेऊन इकोसेन्सिटिव्ह झोन लागू झाल्याने काय चांगल्या बाबी घडतील आणि काय दुष्परिणाम होतील याबाबत सांगतानाच कोणते गैरसमज पसरवले जात आहेत यावर भाष्य केले. मोर्चा मायनिंग आणि लाकूड व्यावसायिक लॉबीने आयोजित केल्याचा आरोप केला आहे. मोर्चा दरम्यान सिद्धिविनायक मंदिरातील बैठकीत आयोजकांनी हा आरोप नाकारला. मोर्चा दोडामार्ग आणि पर्यावरण वाचवण्यासाठी काढला असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: agitation against Eco Sensitive zone in Dodamarg

टॅग्स