पीरलोटेत हजारोंचा अभूतपूर्व मूक मोर्चा

पीरलोटेत हजारोंचा अभूतपूर्व मूक मोर्चा

चिपळूण - पीरलोटे येथे गोवंश हत्येच्या संशयावरून ग्रामस्थ आणि पोलिस यांच्यात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, गुरांची अनधिकृत वाहतूक करून त्यांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी  पीरलोटे येथे हजारो ग्रामस्थांनी मूक मोर्चा  काढला. एवढा मोठा मोर्चा येथे प्रथमच निघाला.

पीरलोटे ग्रामपंचायतीसमोर सुमारे पाच हजारांहून अधिक ग्रामस्थ आणि महिला एकत्र जमल्या. सर्वांनी तोंडावर आणि हातावर काळ्या फिती लावून मोर्चात सहभाग घेतला. पीरलोटे, आवाशी, घाणेखुंट, सोनगाव, कोतवलीसह चिपळूण व खेड तालुक्‍यातील नागरिकांनी मोर्चामध्ये सहभाग होता. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, डॉ. प्रशांत पटवर्धन, भाजपचे शशिकांत चव्हाण, काँग्रेसचे ॲड. आनंद भोसले, बाळा कदम यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी  मोर्चाचे नेतृत्व केले. उपविभागीय अधिकारी  अविशकुमार सोनोने यांना मागणींचे निवेदन देण्यात  आले. मूक मोर्चा झाल्यानंतर शांततेत सर्व ग्रामस्थ आपापल्या गावी निघून गेले. 

अप्पर पोलिस अधीक्षक गायकवाड, वरिष्ठ पोलिस अधिकारी, राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी, जिल्हा राखीव पोलिस दल आणि स्थानिक पोलिसांचा मोठा  आणि सशस्त्र बंदोबस्त होता.

घडलेली घटना ही अनावधानाने घडली आहे, जे झाले ते दुर्दैवी आहेच; मात्र त्याला केवळ ग्रामस्थ जबाबदार नाहीत तर काही निष्काळजी आणि बेजबाबदार पोलिस अधिकारी देखील आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. 
- बाबाजी जाधव,
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस 

जाळपोळ आणि मारहाण करणाऱ्यांना कायदेशीर शिक्षा झालीच पाहिजे; मात्र या घटनेला जबाबदार दोषी पोलिसांवर देखील कारवाई झाली पाहिजे. ती न झाल्यास पोलिस आणि जनता यांच्यात दरी निर्माण होईल. जनतेच्या मनात पोलिसांविषयी प्रक्षोभ होईल.
- वैभव खेडेकर,
नगराध्यक्ष खेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com