सी वर्ल्ड होण्यासाठी बेमुदत उपोषण 

सी वर्ल्ड होण्यासाठी बेमुदत उपोषण 

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सी वर्ल्ड आवश्‍यक आहे; मात्र काहींच्या नाहक विरोधाला शासन बळी पडत असल्याचा आरोप करत हा सी वर्ल्ड प्रकल्प त्वरित सुरु करावा, या मागणीसाठी वायंगणी येथील रहिवासी तुकाराम वायंगणकर यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले. 

पर्यटन जिल्ह्याच्या सौंदर्यात भर टाकणारा आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा सी वर्ल्ड प्रकल्प वायंगणी तोंडवली येथे प्रस्तावित आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यास जिल्ह्यात रोजगार वाढणार आहे तसेच पर्यटकही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प त्वरित सुरु होणे गरजेचे आहे; मात्र या प्रकल्पाला काहीजण नाहक विरोध करत आहेत. या मुठभर लोकांच्या दबावाखाली शासन वावरत असल्याचा आरोप वायंगणी गावचे ग्रामस्थ वायंगणकर यांनी केला आहे. 

विरोधामुळे शासनस्तरावर थांबलेले सी वर्ल्ड प्रकल्पाचे काम त्वरित सुरु व्हावे या मागणीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले होते; मात्र त्यांनीही याकडे दुर्लक्ष केला असल्याचे वायंगणकर यांनी सांगितले. हा प्रकल्प त्वरित सुरु व्हावा या मागणीसाठी त्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com