पीक कर्ज टक्केवारी घसरली? कोणता आहे हा जिल्हा?

Agricultural loans issue konkan sindhudurg
Agricultural loans issue konkan sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील 25 हजार 878 शेतकऱ्यांना 95 कोटी 13 लाख 93 हजार रुपये एवढे 2020-21 या खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. 30 जूनपर्यंत उद्दीष्टाच्या 30.59 टक्के एवढेच हे कर्ज वाटप झाले. यात सर्वात कमी कर्ज जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंकांनी उद्दीष्टाच्या 22.15 टक्के एवढे केले आहे. 9 हजार 788 हेक्‍टर क्षेत्रासाठी हे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅंकांना 2020-21 मधील खरीप हंगामसाठी 311 कोटी रूपयांचे अल्प मुदतीचे शेती कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. यात सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेला 104 कोटी 50 लाख रुपये कर्ज वाटपचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात 35 राष्ट्रीयकृत बॅंका आहेत. या सर्व बॅंकांना मिळून 196 कोटी 50 लाख रुपये कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीण बॅंकांना 10 कोटींचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे. यातील जिल्ह्यात 30 जूनपर्यंत 15 हजार 878 शेतकऱ्यांना 9 हजार 788 क्षेत्रासाठी केवळ 95 कोटी 13 लाख 93 हजार रुपये एवढे कर्ज वाटप झाले आहे. उद्दीष्टाच्या केवळ 30.59 टक्के वाटप झालेल्या कर्जाची टक्केवारी आहे. 

जिल्हा बॅंकेचे 44 टक्के वाटप 
जिल्हा बॅंकेने आतापर्यंत राष्ट्रीय व ग्रामीण बॅंकांच्या तुलनेत सर्वाधिक कर्ज वाटप केले आहे. 46 कोटी 6 लाख 93 हजार रुपये एवढे कर्ज वाटप आहे. 12 हजार 14 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे; मात्र ही टक्केवारी उद्दीष्टाच्या तुलनेत 44.09 टक्के एवढीच आहे. उर्वरित कालावधीत 55.91 टक्के कर्ज वाटप करण्याचे आव्हान राहिले आहे. 

राष्ट्रीयकृत बॅंकांची पाठ 
जिल्ह्यात एकूण 35 राष्ट्रीयकृत बॅंका कार्यरत आहेत. या बॅंकांना मिळून खरीपसाठी 196 कोटी 50 लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे; मात्र 30 जूनपर्यंत कर्ज वाटप केलेल्या आकडेवारीवरुन राष्ट्रीयकृत बॅंकांनी खरिप हंगामात पीक कर्ज वाटपाकडे पाठ फिरविल्याचे सिद्ध होते. उद्दीष्टाच्या केवळ 22.15 टक्केच हे वाटप केले आहे. केवळ 43 कोटी 52 लाख रुपये एवढ्या रक्कमेचे हे वाटप आहे. 3 हजार 327 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत या बॅंकांना 77.85 टक्के कर्ज वाटप करण्याचे आव्हान राहणार आहे. 

ग्रामीण बॅंकांचे सर्वाधिक वाटप 
जिल्ह्यातील ग्रामीण बॅंकांना 10 कोटी रुपये खरिप हंगाम पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. यातील 5 कोटी 50 लाख रूपयांचे कर्ज वाटप झाले. उद्दीष्टाच्या 55 टक्के वाटप झाले असून 537 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. उद्दीष्टाच्या सर्वाधिक वाटप ग्रामीण बॅंकांनी केले आहे; मात्र उर्वरित कालावधीत 45 टक्के म्हणजेच 4 कोटी 50 लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट शिल्लक आहे. 

आता कर्ज वाटप होणार का? 
शेतकरी हे जूनमध्ये अल्प मुदतीचे कर्ज बॅंकांकडून घेतात. कारण याच कालावधीत बी-बियाणे, खते, शेती साहित्य खरेदी केले जाते. यावर्षी जूनच्या सुरूवातीपासून जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडत आहे. हा पाऊस शेतीला पोषक आहे. पावसाने मध्येच विश्रांती घेतलेली नाही. परिणामी जिल्ह्यातील अर्ध्याहुन अधिक भात शेती झाली आहे. त्यामुळे उद्दीष्टाच्या 69.41 टक्के उरलेले कर्ज वाटप होणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

रक्कमेच्या तुलनेत जिल्हा बॅंकेने सर्वाधिक शेती कर्ज वाटप केले. गतवर्षी सुद्धा आमच्या बॅंकेने सर्वाधिक कर्ज वाटप केले होते. त्यामुळे जिल्हा बॅंकेचा सत्कार झाला होता. जिल्हा बॅंक नेहमीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फायद्याचा विचार करते. त्याप्रमाणे शेती कर्ज वाटप बाबत जिल्हा बॅंक नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिली आहे. 
- सतीश सावंत, अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com