पंचनामे करण्यास टाळाटाळ; तलाठ्याविरूद्ध ऐनारी ग्रामस्थ आक्रमक 

पंचनामे करण्यास टाळाटाळ; तलाठ्याविरूद्ध ऐनारी ग्रामस्थ आक्रमक 

वैभववाडी - पुरांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास भुईबावडा तलाठी टाळाटाळ करीत आहेत. याशिवाय ते ग्रामस्थांची उध्दटपणे वागत असून त्यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी ऐनारी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. या तलाठ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. 

भुईबावडा सजामध्ये ऐनारी हे गाव येते. पुरस्थितीमुळे ऐनारी येथील अनेक घरे, गोठे व काजू बागांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ग्रामस्थ तलाठी श्री. कदम यांच्याकडे आग्रह धरीत असतात; परंतु ग्रामस्थांना ते पंचनामे करणार नाहीत. काही करायचे ते करा, अशा प्रकारची उध्दट उत्तरे देतात.

यासंदर्भात शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी देखील पालकमंत्री दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तलाठी श्री. कदम यांच्यामुळे ऐनारी गावातील अनेक कामे रखडली आहेत. पुरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामे करून आधार देण्याची गरज असताना तलाठी श्री. कदम हे तेथील लोकांना आणखी त्रास देत आहेत. तरी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

""ऐनारी ग्रामस्थांनी आपल्यांकडे निवेदन दिलेले आहे. त्यांच्या निवेदनाची खात्री करून वरिष्ठांच्या सुचनेनुसार योग्य तो निर्णय घेण्यात येईल.'' 
- रामदास झळके,
तहसीलदार, वैभववाडी. 
 
गावातून उचलबांगडी करा 
गेली दोन वर्ष हे तलाठी या गावात असून ग्रामस्थांचे त्यांचे वर्तन चांगले नाही. त्यामुळे 2017 मध्ये त्यांची गावातून बदली करावी, असा ठराव ऐनारी ग्रामसभेत करण्यात आला होता. आता सुध्दा आक्रमक भूमिका घेत या तलाठ्यांची तत्काळ गावातून उचलबांगडी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी तहसिलदारांकडे केली आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com