गणपतीपुळे परिसराची हवाई सफर (व्हिडिआे)

अमोल कलये
सोमवार, 24 डिसेंबर 2018

रत्नागिरी - कोकणात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहेत. स्कुबा डायव्हिग, समुद्र सफर या प्रमाणे आता हवाई सफरही घडवण्यात येत आहे. गणपतीपुळे, मालगुंड परिसरात ही सुविधा सध्या उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

कोकणाचे नैसर्गिक साैंदर्य पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. यातच हवाई सफरीतून कोकणचे दर्शन घडविण्याचा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गणपतीपुळे मालगुंड किनाऱ्यावर हेलिकाॅप्टर राईड सुरू झाली आहे. पर्यटन सहकारी संस्था, पुणे येथील राष्ट्रभक्ती संघटना आणि एरोलीफ एव्हीएशन सर्व्हीस यांच्यावतीने पर्यटकांसाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे.

मालगुंड येथून उड्डाण केलेले हेलिकाॅप्टर आरेवारे बीच, गणपतीपुळे बीच, गणपतीपुळे मंदिर येथील डोंगराला प्रदक्षिणा घालून पुन्हा मालगुंड येथे परतते. सात मिनिटाच्या कालवधीत घडविण्यात येणारी हवाई सफर पर्यटकांसाठी लक्षवेधी ठरत आहे. दोन दिवसांपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत ही हवाई सफर सुरु राहणार आहे. हेलिकाॅप्टरमधून दिसणारे कोकणचे सौंदर्य, समुद्रकिनारे याचे विहंगम दृश्य या हवाई सफरच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. 

Web Title: Air travel service of Ganapatipule area