esakal | अभाविप ने मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र : शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्तीबाबत या आहेत मागण्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad demanded special scholarships be announced for students in the district letter for Konkan State Minister Prerna Pawar

पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

 

अभाविप ने मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र : शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्तीबाबत या आहेत मागण्या...

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये 4 टप्प्यांमध्ये शुल्क भरण्याची सुविधा त्वरित देण्यात यावी. आर्थिक दृष्टीने मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क माफी जाहीर करावी. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती जाहीर करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक महाविद्यालय संपूर्ण शुल्क भरायला विद्यार्थ्यांना भाग पाडत आहेत. विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शैक्षणिक शुल्काबद्दल ठोस धोरण तात्काळ जाहीर करावे, अशी मागणी करत अभाविपने केली आहे.


प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे शुल्क व शिष्यवृत्ती लॉकडाऊनमुळे बर्‍याच पालकांच्या रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. ही समस्या प्रामुख्याने भेडसावत आहे. काही महाविद्यालयांमध्ये शुल्क देण्याची सक्ती केली जात आहे. त्यांचे निकाल रोखून ठेवण्यात येत आहेत. तरी अशा महाविद्यालयांवर कारवाई करावी. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन असे प्रकार त्वरित थांबवावे, असे अभाविपने म्हटले आहे.


मागील दोन शैक्षणिक वर्षातील बाकी असलेली शिष्यवृत्ती त्वरित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे टाळेबंदी काळात घेतलेले वसतिगृह शुल्क परत करण्यात यावे. विद्यापीठांनी, महाविद्यालयांनी हेल्पलाईन त्वरित सुरू करावी, अशा विविध मागण्या केल्याची माहिती अभाविप कोकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी दिली.


संपादन - अर्चना बनगे 

loading image
go to top