खात्री करूनच रत्नागिरीत 'त्या' गोळ्यांचे वाटप होणार ; मंत्री सामंत यांची माहिती

Album Homeopathy pills boost immunity say minister uday samant
Album Homeopathy pills boost immunity say minister uday samant

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही अफवा न पसरवता सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्यांमुळे प्रतिकारशक्ती वाढते. याबाबत पूर्णतः खात्री केली असून रत्नागिरी जिल्हयातील सुमारे साडेचार लाख कुटूंबांना या गोळ्यांचे मोफत वाटप जिल्हाप्रशासन करणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.


जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक बोल्डे, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, आयुष डॉ. अश्फाक काझी उपस्थित होते. पुढे बोलताना सावंत म्हणाले, आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्या व्यक्तींमधील प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. आज देशभरात याला मागणी आहे; मात्र संपूर्ण जिल्ह्यात घरोघरी या गोळ्या वाटप करणारा रत्नागिरी जिल्हा पहिला आहे. याचे नियोजन जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयुष विभागाकडून केले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गतील एकही कुटुंब वंचित राहू नये अशी व्यवस्था केली असून आशा वर्करच्या माध्यमातून घरोघरी वाटप होईल. कोविड फंडातून यासाठीचा खर्च केला जाणार आहे. गोळ्यांची उपलब्धता कमी असेल तर दोन टप्प्यात याचे वाटप होईल. या गोळ्या तीन दिवस सकाळी उपाशी पोटी तीन घ्यावयाच्या असून याची माहिती गोळ्या वाटप करताना देण्यात येणार आहे. या गोळ्यांमुळे खूप चांगले परिणाम होतो आपली प्रतिकार शक्ती निश्‍चितच वाढते. कोरोनापासून बचावासाठी ही उपाययोजना केली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात मुंबईतून रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात 25 हजार चाकरमानी दाखल झालेत. 24 एप्रिल ते 15 मे या कालावधीत जवळपास 17 हजार चाकरमानी कोकणात आले आहेत. गेल्या तीन दिवसात पाच हजाराहून अधिक चाकरमानी रत्नागिरीत आले आहेत. मुंबईतून येणार्‍या चाकरमान्यांना पाठवू नका अशी भूमिका कुठेही घेतलेली नाही.


रत्नागिरी जिल्ह्यात चाकरमान्यांबाबत सोशल मीडियावर गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. याला कुठेतरी आळा बसला पाहीजे. येणारे चाकरमानी हे आपलेच आहेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने टप्याटप्याने नियोजन करत आहे. येत्या दोन महिन्यांच्या आत परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन सामंत यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com