अलिबागच्या जंगलात गावठी बॉंबचा कारखाना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

अलिबाग - विक्रीसाठी आणलेल्या 290 गावठी बॉंबसह एका तरुणाला अटक केल्यानंतर ठाणे पोलिसांनी अलिबाग तालुक्‍यातील नारंगीचा टेप परिसरातून त्याच्या साथीदाराला अटक केली. ते दोघे अन्य साथीदारांच्या मदतीने नारंगीचा टेप येथील जंगलात गावठी बॉंब बनवत असल्याचे तसेच ऑर्डरनुसार त्यांचा संबंधितांना पुरवठा करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-शीळफाटा येथे गावठी बॉंब विकण्यासाठी आलेल्या प्रवीण पाटील (34, रा. नवखार-मोरापाडा) याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने 26 मार्चला अटक केली होती. तो बॉंबच्या ऑर्डर घेण्याचे काम करत असल्याचे उघड झाले होते. त्याच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बुधवारी नारंगीचा टेप येथून रमेश पवार (50) याला अटक केली.

Web Title: alibag konkan news bomb factory in alibag forest