डीजेचालकांवर अलिबागमध्ये कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

अलिबाग - विजर्सन मिरवणुकीत मंगळवारी (ता. 5) ध्वनिप्रदूषण निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी तीन डीजेचालकांवर कारवाई केली आहे. तसेच, त्यांची साऊंड सिस्टीम आणि वाहने जप्त करण्यात आली.

अलिबाग - विजर्सन मिरवणुकीत मंगळवारी (ता. 5) ध्वनिप्रदूषण निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी तीन डीजेचालकांवर कारवाई केली आहे. तसेच, त्यांची साऊंड सिस्टीम आणि वाहने जप्त करण्यात आली.

गोंधळपाड्यातील स्वप्नील शशिकांत गाडे, शास्त्रीनगर येथील गणेश सहदेव कामतेकर आणि मुशेत येथील अकबर हमीद सय्यद या डीजेचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रण नियम 2000 नुसार कारवाई करण्यात आली. हे तिघेही सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरत होते. न्यायालयाच्या सूचनेनुसार ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी अलिबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक पथक तयार करण्यात आले होते.

Web Title: alibag konkan news crime on DJ owner