रायगड जिल्हा बॅंकेवर सलग पाचव्यांदा "पाटीलकी'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

अध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची बिनविरोध निवड
अलिबाग - रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची सलग पाचव्यांदा निवड झाली आहे. ही निवड बिनविरोध करण्यात आली.

अध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची बिनविरोध निवड
अलिबाग - रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची सलग पाचव्यांदा निवड झाली आहे. ही निवड बिनविरोध करण्यात आली.

बॅंकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी (ता. 12) बॅंकेच्या सभागृहात झाली. अध्यक्षपदासाठी जयंत पाटील; तर उपाध्यक्षपदासाठी सुरेश खैरे यांचा अर्ज आला होता. या दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हा उपनिबंधक पी. एम. खोडका यांनी जाहीर केले. यानंतर ज्येष्ठ संचालक प्रभाकर पाटील, ज्येष्ठ शेकाप नेते शंकरराव म्हात्रे यांनी पाटील, खैरे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
आमदार पाटील म्हणाले की, बॅंकेचा नेट एनपीए हा मागील दहा वर्षांपेक्षा अधिक काळ शून्य टक्के आहे. शेतकरी आणि मच्छीमारांची आर्थिक उंची वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यांच्या मालाचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यात शंभर गोदामे उभारण्याचा विचार आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी करून जिल्हा बॅंक हायटेक करण्याचा प्रयत्न राहील.

बॅंकेने जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे हित सांभाळूनच प्रामाणिकपणे काम करून बॅंकेची उंची वाढवली आहे. बॅंकेने सलग तीन वर्षे 50 कोटींपेक्षा अधिक ढोबळ नफा कमावला आहे.
-आमदार जयंत पाटील, नवनियुक्त अध्यक्ष, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक

Web Title: alibag konkan news jayant patil selection on raigad district bank