जुन्या नाट्यगृहांचे नूतनीकरण - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

अलिबाग (जि. रायगड) - राज्यात कला क्षेत्राच्या कक्षा रुंदावत असल्याने अधिक नाट्यगृहांची गरज आहे. नवी नाट्यगृहे उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देतानाच नगरपालिकांनी उभारलेल्या जुन्या नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

अलिबाग जवळ चेंढरे येथे सहकारी तत्त्वावर उभारलेल्या राज्यातील पहिल्या नाट्यगृहाचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी फडणवीस म्हणाले, 'राज्यात नगरपालिकांची अनेक जुनी नाट्यगृहे अस्तित्वात आहेत; मात्र त्यांची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्याचा विचार आहे. सहकार तत्त्वावरील दुसरे आधुनिक नाट्यगृह सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्याचा सरकारचा विचार आहे.''

Web Title: alibag konkan news old auditorium development