पोलादपूर अपघातात ५ ठार; दीड वर्षाचा मुलगा बचावला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

अलिबागः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील पार्ले ते दिविल के. टी. बंधारा परिसरात आज (शुक्रवारी) सकाळी १० वाजता झालेल्या अपघातात कंटेनरखाली मिनिडोर चिरडून पाचजण ठार तर सातजण जखमी झाले. दीड वर्षाचा रूद्र चव्हाण हा मुलगा बाहेर फेकला गेल्याने सुखरूप बचावला आहे.

अलिबागः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील पार्ले ते दिविल के. टी. बंधारा परिसरात आज (शुक्रवारी) सकाळी १० वाजता झालेल्या अपघातात कंटेनरखाली मिनिडोर चिरडून पाचजण ठार तर सातजण जखमी झाले. दीड वर्षाचा रूद्र चव्हाण हा मुलगा बाहेर फेकला गेल्याने सुखरूप बचावला आहे.

महाडकडून पोलादपूरकडे येणारी आठ आसनी मिनीडोर पोलादपूरच्या दिशेने येत असताना गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव कन्टेनरने या मिनिडोरला जोरदार धडक देऊन साईडपट्ठी नसलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाखाली नेत मिनिडोरवर हा कंटेनर थांबला. यावेळी मिनिडोरमधील दोन प्रवासी मिनिडोरबाहेर फेकले गेल्याने ते वाचले तर कंटेनर खाली आलेल्या मिनिडोरमधील चालकासह 10 प्रवासी मिनिडोरसह चिरडले. पोलादपूर पोलीसांनी तातडीने ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मिनिडोरबाहेर काढण्यात यश मिळविले. यानंतर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये हलविण्यात आलेल्या मिनीडोर चालक मुझफ्फर उस्मान येलूकर, निकम अंबाजी कांबळे, नाबीबाई बाबूराव जाधव, दिनेश शंकर चोरगे यांचा मृत्यू अपघातस्थळीच झाल्याचे डॉ. भाग्यरेखा पाटील, डॉ.सलागरे आणि डॉ.राजेश शिंदे यांनी जाहिर केले.

दीड वर्षाचा रुद्र बचावला
जखमींपैकी दीड वर्षांचा रूद्र रमेश चव्हाण हा अपघातातून किरकोळ जखमा होऊन बचावला तर साने गुरूजी विद्यालयामध्ये जाणारा दुसरा मुलगा सोहम सचिन जाधव वय 6 चांढवे खुर्द याला अपघातस्थळापासून तातडीने महाड ग्रामीण रूग्णालय येथे हलविण्यात आले. परंतु, बचावाचे प्रयत्न अपयशी ठरले.

मृतांची नावे
मिनीडोर चालक मुझफ्फर उस्मान येलूकर (वय 40, माटवण मोहल्ला ता. पोलादपूर), नाबीबाई बाबूराव जाधव (वय 70 चांढवे खुर्द, ता. महाड), निकम अंबाजी कांबळे, (वय 38 चांढवे खुर्द, ता. महाड), सोहम सचिन जाधव (वय 6 चांढवे खुर्द, ता. महाड), दिनेश शंकर चोरगे (वय 40 रानवडी, खडकवाडी, ता. पोलादपूर)

जखमींचा नावे
सतोष वसंत पोळेकर (वय 29 नडगांव, ता. महाड), दशरथ नारायण सुतार (वय 46 नडगांव, ता. महाड), रविना राकेश चाळके (वय 40 चांढवे खुर्द, ता. महाड), श्रीमती इंदू विठोबा चव्हाण (वय 54 चांढवे खुर्द, ता. महाड), अनिता गणपत पवार (वय 64 चांढवे खुर्द, बौध्दवाडी, ता. महाड), ‎रूद्र रमेश चव्हाण (वय दीड वर्षे, चांढवे खुर्द, ता. महाड), देवेश राकेश चाळके (वय 7 चांढवे खुर्द, ता. महाड) यांचा समावेश आहे.

Web Title: alibaug news accident in poladpur 5 dead 7injured