कोकणातील मतदारांना सर्वच राजकीय पक्षांनी फसवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

वाडा : पदवीधर मतदारसंघातून आजवर ज्या-ज्या राजकीय पक्षांनी प्रतिनिधित्व केले. त्या सर्वच राजकीय पक्षांनी कोकणातील पदवीधर मतदारांना फसल्याची टीका पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सुवर्णाताई पाटील यांनी वाड्यात केली. त्या प्रचाराच्या निमित्ताने वाड्यात आल्या असताना त्यांनी येथील विविध शाळांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.

वाडा : पदवीधर मतदारसंघातून आजवर ज्या-ज्या राजकीय पक्षांनी प्रतिनिधित्व केले. त्या सर्वच राजकीय पक्षांनी कोकणातील पदवीधर मतदारांना फसल्याची टीका पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सुवर्णाताई पाटील यांनी वाड्यात केली. त्या प्रचाराच्या निमित्ताने वाड्यात आल्या असताना त्यांनी येथील विविध शाळांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.

येत्या २५ जूनला कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत, असून ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सुवर्णाताई पाटील या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना कोकणातील विविध सामाजिक संघटना पदवीधरांच्या संघटनानी पाठिंबा दर्शविला आहे. संपूर्ण कोकणात त्या प्रचाराच्या निमित्ताने फिरत आहेत. बुधवारी ( दि. २० )  त्यांनी वाडा तालुक्यात प्रचार दौरा केला. त्यावेळी तालुक्यातील महाविद्यालये, शाळा येथे भेटी देऊन पदवीधर मतदारांशी संपर्क साधला.

यावेळी पी. जे. हायस्कूल, कला व वाणिज्य महाविद्यालय, व मॅनेजमेंट कॉलेज येथे मतदारांशी संवाद साधताना त्यांनी आजवर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना आपण पदवीधर मतदारसंघातून संधी दिली मात्र निवडून गेलेल्या उमेदवारांनी कोकणातील पदवीधरांचे व तरुणांचे प्रश्न प्रश्न सोडविण्यात स्वारस्य दाखवले नाही त्यामुळे त्या येथील प्रश्न तसेच राहिले असून सातत्याने  निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी कोकणातील मतदारांची फसवणूक केली अशी टीका पाटील यांनी केली. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्षांना धडा शिकवण्याची संधी असून मतदार या निवडणुकीत राजकीय पक्षांना नाकारतील असा विश् राजकीय पक्षांना धडा शिकवण्याची संधी असून मतदार या निवडणुकीत राजकीय पक्षांना नाकारतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

पदवीधर मतदार संघाच्या माध्यमातून आगामी काळात आपण येथील पदवीधरांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच कोकणातील विकासाचे प्रश्न  सोडविण्याला आपल्या प्राधान्य असेल असे म्हणत आपल्याला मतदान करण्याचे आवाहन पाटील यांनी मतदारांना केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बागूल, काशीनाथ भोईर, नितीन पाटील, वीरसेन पाटील, तुषार पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: All the political parties in the Konkan region have been deceived