पालीत चार हजार ज्येष्ठ नागरीकांना वयाचे दाखल्यांचे वाटप

अमित गवळे 
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पाली - डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने मंगळवारी (ता.4) जिल्हा शल्यचिकित्सक अलिबाग यांचे सहकार्याने ज्येष्ठ नागरीकांना वैद्यकिय वय प्रमाणपत्र वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हे शिबीर संपन्न झाले. सुधागड तालुक्यातील वयाची 60 वर्ष पुर्ण असलेले परंतू, ज्या नागरीकांकडे वयाचा पुरावा नाही अशा चार हजार जेष्ठ नागरीकांना यावेळी वयाचा दाखला देण्यात आला. 

या कार्यक्रमात उपस्थितांना तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. ज्येष्ठ नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्याकरीता आवश्यक असलेल्या वयाच्या दाखल्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. काही नागरीकांनी शाळेत प्रवेशच घेतला नाही त्यांना वयासबंधी दाखल्याची आवश्यकता भासते. याकरीता जिल्हा शल्य चिकित्सक यांचे सहकार्य मिळाले आहे. सदर दाखले मिळवण्याच्या प्रक्रीयेत ज्येष्ठ नागरीकांना शारिरीक, माणसिक त्रासा बरोबरच आर्थीक झळ ही सोसावी लागत असे. ही बाब लक्षात घेवून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने राबविलेला उपक्रम प्रभावी आहे असे  मराठा सुराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष  प्रणय सावंत यांनी सांगितले.

या कार्यक्रमास जिल्हा सामान्य रुग्नालय अलिबागचे शल्य चिकित्सक डॉ. अजीत गवळी, पाली तहसिलदार बि.एन. निंबाळकर, पाली सुधागड पंचायत समितीच्या सभापती साक्षी दिघे, पंचायत समिती सदस्या सविता हंबीर, पाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. रुस्तम दामले, मराठा सुराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रणय सावंत आदिंसह मान्यवर व श्री सदस्य उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सामान्य रुग्नालयाच्या पथकासह डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्यांनी मेहनत घेतली.
 
Web Title: Allot of age proofs to four thousand senior citizens in the pali