भटवाडी अंगणवाडीत पोषण आहाराचे वाटप

लक्ष्मण डुबे 
मंगळवार, 10 एप्रिल 2018

रसायनी (रायगड)- वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दितील भटवाडी येथील अंगणवाडीत कुपोषित बालक, गरोदर माता, स्तनदा माता यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापति ऊमाताई मुंढे, खालापुर तालुका पंचायत समिति सदस्या कांचन पारंगे आणि वृशाली पाटील, तालुका बालविकास प्रकल्प आधिकारी राजन सांबरे, मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप मुंढे, माजी उपसरपंच सुनंदा मालकर, सदस्या प्रमिला दळवी, चांभार्लीच्या सरपंच विनया मुंढे आदि उपस्थित होते. 

जन्मापासून सहावर्षापर्यंत बालकांसाठी एकात्मिक बाल कल्याण विभागाकडून पोषण आहार पुरविण्यात येत आहे. पोषण आहार या योजनेत खालापुर तालुक्यात घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी व गरोदर मातांसाठीचे आहार वाटप बंद होते. महिला व बालकल्याण सभापती उमाताई मुंढे यांनी पोषण आहार पुरवठ्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रयत्न केले. 

खालापूर तालुक्यात पुन्हा पोषण आहार सुरळीत वाटप होणार असल्याचे उमाताई मुंढे यांनी सांगितले. लाभार्थ्यांना शिरा, शेवया, उपमा, खिचडीसह लहान बालकांना सकस बाल आहार वाटप करण्यात आला. यावेळी आहाराचे वजन करण्यात आले. बाल आहारात गहू, साखर, चणा, सोयाबीन, शेंगदाणे आदींचे कुटमिश्रण असल्याने ते शरीराला पोषक असल्याचे सभापती उमाताई मुंढे म्हणाल्या. दरम्यान पोषण आहाराचे पुन्हा वाटप सुरू झाले असल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे. 

Web Title: Allotment of Nutrition Diet in Bhatwadi Anganwadi