हापूस अाता सर्वसामान्यांच्या अावाक्यात

अमित गवळे
सोमवार, 28 मे 2018

पाली (रायगड) : हापुस अांब्याचे कमी उत्पादन व अपुरा पुरवठा यामुळे हापूस अांब्याच्या किंमती तीनशे ते पाचशे रुपये डझनावर गेल्या होत्या. मात्र मागील काही दिवसांपासून स्थानिक हापुस देखिल बाजारात अाल्याने हापूस अांबा खाणे अाता सर्वसामान्यांसाठी अावाक्यात अाले आहे. सध्या बाजारात 80 ते 150 रुपये डझनने हापूस अांबा मिळत आहे. त्यामुळे खवय्ये मात्र भलतेच खूष अाहेत.

पाली (रायगड) : हापुस अांब्याचे कमी उत्पादन व अपुरा पुरवठा यामुळे हापूस अांब्याच्या किंमती तीनशे ते पाचशे रुपये डझनावर गेल्या होत्या. मात्र मागील काही दिवसांपासून स्थानिक हापुस देखिल बाजारात अाल्याने हापूस अांबा खाणे अाता सर्वसामान्यांसाठी अावाक्यात अाले आहे. सध्या बाजारात 80 ते 150 रुपये डझनने हापूस अांबा मिळत आहे. त्यामुळे खवय्ये मात्र भलतेच खूष अाहेत.

बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात हापुस अांबा दाखल झाला आहे. जिल्ह्यातील हापुस अांबा सध्या तयार झाला आहे. त्यामुळे बागायतादार, अांबा उत्पादक व छोटे मोठे व्यापारी त्याची स्थानिक बाजारात विक्री करत आहेत. परिणामी देवगड व रत्नागिरीच्या अांब्यांवर खवय्यांना थांबण्याची अावश्यकता नाही. स्थानिक हापुस बरोबरच कर्नाटकी, पायरी, तोतापुरी, निलम, गावठी, बिटके (छोटे) अांबे, चोखायचे अांबे अादी विविध प्रजातींचे अांबे देखिल स्वस्तात बाजारात उपलब्ध अाहेत. त्यामुळे खवय्यांची पुरती चंगळ झाली आहे.

ढगाळ वातावरणामुळे झाडांवरील अांबे काढण्याची लगबग
मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. यामुळे झाडावरील अांबा डागाळण्याची व खराब होण्याची भिती अाहे. वादळवारा व पाऊस अाल्यास अांबे झाडावरुन खाली पडून खराब होतात. यामुळे अनेक बागायदार व घरगुती अांबा उत्पादकांची झाडावरील अांबे उतरविण्याची लगबग सुरु आहे. परिणामी झाडावरुन अांबे उतरविणार्यांना मागणी वाढली असून त्यांच्या देखील हाती चांगले पैसे मिळतात.

देवगड व रत्नागिरीचा हापूस मोठ्या प्रमाणात पुणे व मुंबईच्या मार्केटमध्ये नेला जातो. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर मार्च महिन्यापासूनच देवगड व रत्नागिरीच्या हापूसच्या पेट्या वाहून नेणार्या वाहनांची रेलचेल पहायला मिळत अाहे. हापूसच्या पेट्या नेणार्या एका वाहन चालकाने सांगितले की रात्री गाड्यांमध्ये हापुसच्या पेट्या भरुन मुंबई पुण्याला निघतो. मग सकाळी वाशी मार्केटला पोहचतो. तेथे दलाल व व्यापार्यांना माल देवून पुन्हा परतीला निघतो. रात्री पुन्हा हा प्रवास सुरु होतो. एका पेटीमागे शंभर रुपये मिळतात. त्यामुळे ट्रक, टेंम्पो व मालवाहतुक दारांचा धंदा देखिल तेजित असतो.

अादिवासींच्या हाती चार पैसे
जिल्ह्यातील अनेक अादिवासीं जंगलात किंवा स्वतः लावलेल्या अांब्याच्या झाडांवरील अांबे बाजारात टोपल्यांमधून घेवून विक्रिसाठी येत आहेत. अनेक जण फार्महाऊस मालकांच्या मार्फत अांबे विक्रिसाठी अाणत आहेत. विविध प्रकारचे गावठी अांबे तर फक्त अादिवासी बांधवांकडेच मिळतात. सेंद्रिय व नैसर्गिक रित्या वाढ झालेले हे अांबे अारोग्यास उत्तम असतात. त्यामुळे सध्या अादिवासी बांधवांना हे अांबे विकुन चार पैसे हाती लागत आहेत.
 

Web Title: Alphonso mango now bearable to all