esakal | सावंतवाडीत अज्ञाताने जाळली अल्टो कार
sakal

बोलून बातमी शोधा

Alto car fire case sawantwadi

गाडी जळून खाक झाली

सावंतवाडीत अज्ञाताने जाळली अल्टो कार

sakal_logo
By
भूषण आरोसकर

सावंतवाडी : झाराप-पत्रादेवी बायपासलगत घराच्या वरच्या भागात सर्व्हीस रोडवर झाकून ठेवलेल्या अल्टो कारला काल रात्री दीडच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत मोटार पूर्ण भस्मसात झाली असून दिवाळी सणाच्या तोंडावरच हे  नुकसान झाले. मळगाव बाजारपेठेतील रंगोली कॉस्मेटिक स्टोअरचे मालक दत्‍ताराम उर्फ बाबल सावंत ( सध्या रा .मळगाव, मूळ बांदा) यांची ही मोटार असून अज्ञाताने आग लावली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत आज येथील पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविण्यात आली असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. 


हा प्रकार घडला त्यावेळी येथील शहरातील रवींद्र डेकोरेटर्सचे मालक अमीत अरवारी हे त्या ठिकाणाहून सावंतवाडीत जात होते. यावेळी त्यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी तात्काळ पालिकेच्या बंबाला पाचारण केले. तत्काळ बंब घटनास्थळी दाखल झाला. बंबावरील कर्मचारी नंदू गावकर मनोज जाधव यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्पूर्वीच गाडीने पूर्णपणे पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाली. याबाबतची माहिती मिळताच येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

हेही वाचा- कर्नाटकातील गुटखा गोवामार्गे कोकणात: अनेक कंपन्या बनावट -

त्यांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.  मळगाव बायपासच्या सर्विस रोड लगत याठिकाणी काही घरे आहेत. अनेक वर्षे मागणी करूनही महामार्ग प्राधिकरणाने या घरां पर्यंत जाणाऱ्या सर्विस रोडचे काम अर्धवट ठेवले आहे. त्यामुळेच श्री. सावंत यांना रस्त्यालगत पार्क करावी लागली होती. या प्रकारामागे कोणाचातरी हात असल्याचा संशयही व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकाराचा त्वरित शोध घ्यावा अशी मागणीही करण्यात येत आहे.

संपादन- अर्चना बनगे

loading image
go to top