पालीत नित्याची वाहतूक कोंडी; बाह्यवळण मार्ग कधी होणार?

अमित गवळे
शुक्रवार, 1 जून 2018

पाली (रायगड) : अष्टविनायाकापैक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत नेहमीच भाविकांची रेलचेल असते. उन्हाळी सुट्टयांमुळे तर रोज हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने पालीत दाखल होत आहेत. त्यामुळे येथे वारंवार वाहतुक कोंडी होत असुन भाविक, पादचारी व विदयार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पालीच्या बाहेरुन पर्यायी (बायपास) मार्गाला मंजुरी असुनही हा बाह्यवळण (बायपास) मार्ग लालफितीत अडकला आहे. या संदर्भात सकाळ मागील दोन तीन वर्षांपासून बातम्यांच्या पाठपुरावा करत आहे.

पाली (रायगड) : अष्टविनायाकापैक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत नेहमीच भाविकांची रेलचेल असते. उन्हाळी सुट्टयांमुळे तर रोज हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने पालीत दाखल होत आहेत. त्यामुळे येथे वारंवार वाहतुक कोंडी होत असुन भाविक, पादचारी व विदयार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पालीच्या बाहेरुन पर्यायी (बायपास) मार्गाला मंजुरी असुनही हा बाह्यवळण (बायपास) मार्ग लालफितीत अडकला आहे. या संदर्भात सकाळ मागील दोन तीन वर्षांपासून बातम्यांच्या पाठपुरावा करत आहे.

खाजगी, अवजड व लक्झरी वाहनांची ये-जा, नियमांचे उल्लंघन करणारे चालक, अरूंद रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने व बांधकामे यामूळे पालीत सतत वाहतूक कोंडी असते. सुट्टयांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीत दाखल होत आहेत. या वाहनांमुळे पालीतील वाहतुकीवर प्रचंड ताण येवुन वारंवार अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी होत आहे. बल्लाळेश्वर मंदिर, ग.बा. वडेर हायस्कूल, जुने एस.टी.स्टँड, गांधी चौक, बाजारपेठ, मारुती मंदिर या ठीकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. हि वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी काही नाक्यावर वाहतुक पोलीस तैनात असुन देखिल अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, एकेरी वाहतुकीवररुन दुहेरी वाहतुक आणि वाहनचालकांनी वाहतुकिचे नियम न पाळल्याने व रस्त्याच्या दुतर्फा अवैध्यरित्या पार्क केलेली वाहने यांमुळे पोलीसांना या वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक देखिल वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी तैनात आहेत. अनेक वेळा वाहतुक कोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहचण्यास उशिर होतो. संध्याकाळ नंतर मात्र बर्याच वेळा वाहतुक पोलीस तैनात नसतात. अाणि यावेळी सुद्धा बर्याचवेळा वाहतुक कोंडी होते.

यावर नियंत्रण मिळविण्यासाठी बाह्यवळण (बायपास) काढण्याची मागणी येथील नागरिकांकडुन वारंवार होत आहे. बलाप गावावरुन थेट बल्लाळेश्वर मंदिराजवळ मार्ग काढण्याचा पर्याय आहे. त्यासाठी शासनाची मंजुरी देखिल मिळाली आहे. परंतू हा पर्यायी मार्ग लालफितीत अडकला आहे.

अतिक्रमणे हटवावी..
वारंवार होणार्या वाहतुक कोंडीमुळे सर्वांचीच मोठी गैरसोय होते. काही टापऱ्या, दुकाने, हॉटेल्स, घरे व बिल्डिंगची जी काही अनधिकृत व रस्त्याच्या कडेला असलेली बांधकामे आहेत ती त्वरित हटवावित किंवा ग्रामपंचयती मार्फत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अनेक ठिकाणी वाहतुक पोलीसांची गरज असते मात्र तेथे वाहतुक पोलीस नसतात. वाहनचालकांनी सुद्धा वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लवकरात लवकर पर्यायी बाह्यवळण रस्तास्ता तयार करण्यात यावा.
- निलेश शिर्के, पाली

सोयीच्या मार्गामुळे वाहतुक कोंडी
सध्या मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे पुण्या-मुंबई वरुन कोकणाकडे जाणारे प्रवासी खोपोली मार्गे पालीतून विळेमार्गे माणगाववरुन किंवा वाकणवरूण पुढे जातात. तर कोकणाकडून येणारी वाहने माणगाववरुन विळे मार्गे किंवा वाकणमार्गे पालीतून खोपोलीमार्गे पुणे-मुंबईकडे जातात. परिणामी पालीत प्रचंड वाहुक कोंडी होते.
 

Web Title: always traffic jam in pali raigad when built a bypass