आंबेनळी अपघात स्थळी आठवण पाँईटचा फलक

सुनील पाटकर
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

महाड : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात महाबळेश्वर येथे निघालेल्या दापोली येथील डॅा.बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसला 28 जुलैला झालेल्या अपघातात 30 जणांचा जागीच मृत्यु झाला होता. या अपघात ठिकाणी आता आठवण पाँईट म्हणून फलक लावण्यात आला आहे. या फलकावर शोकाकूल आई वडिल, मुले असा नामोल्लेखही करण्यात आला आहे. यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागही संभ्रमात पडलेला आहे. दोन वर्षापूर्वी सावित्री पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर हा पूल अनेकांसाठी सेल्फी पाँईंट झाला होता.

आता आंबेनळी घाटातही असाच प्रकार झाला आहे. आंबेनळी घाटातील हा अपघात अत्यंत दुर्दैवी असा होता यात 30 जणांचा जागीच मृत्यु झाला होता. त्यामुळे अनेक कुटूंबाना मानसिक धक्काही बसला. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तेथे आठवण आठवण पाँईट असा पक्का फलक लावला गेला आहे. हा फलक कोणी लावला याची माहिती नाही. या फलकावर शोकाकूल आई वडिल, मुले असा नामोल्लेखही करण्यात आला आहे. यामुळे बांधकाम विभागही सावध भूमिका घेत आहे. हा फलक मृतांच्या नातेवाईकांनी लावला की अन्य कोणी याबाबत कोणत्याच विभागाला माहिती नाही. अपघाता बाबत सर्वांनाच सहानभूती आहे परंतु असे फलक भविष्यात पिकनिक पाँईट, सेल्फी पाँईट तसेच वाहनचालकांना विचलित करणारे ठरु शकतात.

Web Title: Ambenali Accident spot Remembrance board