आंबोली अपघातः  क्‍लीनरचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

आंबोली - येथील घाटात बुधवारी (ता.5) सायंकाळी कोसळलेल्या डंपरमधील क्‍लीनरचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह आज सकाळी सापडला. दीपक श्‍यामराव सावंत (वय 26, रा. देवसू) असे त्याचे नाव आहे. यातील चालक बचावला होता.

आंबोली - येथील घाटात बुधवारी (ता.5) सायंकाळी कोसळलेल्या डंपरमधील क्‍लीनरचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह आज सकाळी सापडला. दीपक श्‍यामराव सावंत (वय 26, रा. देवसू) असे त्याचे नाव आहे. यातील चालक बचावला होता.

आंबोली येथील घाटात काल डंपर कोसळला. डंपरमध्ये (एम.एच.07.5576) खडी होती. ती घेवून विठ्ठल लिंगाप्पा नाईक (वय 25) व दीपक सावंत (वय 28, दोन्ही रा. देवसू) हे दोघेही कानूर येथून सावंतवाडीच्या दिशेने येते होते. डंपर घाटातील दरडीच्या थोडा पुढे आला असता नियंत्रण सुटून हा अपघात घडला. हा डंपर सुमारे 400 फूट खाली जावून अडकला होता. अपघातानंतर विठ्ठल याला बचाव पथकाने दरीतून बाहेर काढले. दीपकचा उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. 

आज सकाळी नऊ वाजता आंबोली बचाव पथकाचे मायकल डिसोझा, अजित नार्वेकर, उत्तम नार्वेकर, दीपक मेस्त्री तसेच सांगेलीतील बाबल आल्मेडा दरीत उतरले. त्यांना दीपक सावंत याचा मृतदेह आढळून आला. डंपर खाली कोसळला तेव्हा पलटी होताना त्याखाली सापडल्याने डोके फुटून त्यांचा मृत्यू झाला होता. येथील पोलिसांनी त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी सावंतवाडी येथे नेण्यात आला. यावेळी त्याचे नातेवाईक पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक विश्‍वास सावंत, गजानन देसाई, राजेश गवस यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

दीपक याच्या पश्‍चात आई वडील, पत्नी, 2 भाऊ, 1 मुलगी असा परिवार आहे. दीपकचा 3 दिवसापूर्वीच वाढदिवस साजरा करण्यात आला होता.

Web Title: Amboli accident follow up