पाणीदार आंबोली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या आंबोलीत १९९५-९६ पासून वर्षा पर्यटनाला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात कुटुंबवत्सल पर्यटकांचा ओघ होता; मात्र नंतर याला जत्रेचे रूप आले. यातून अनेक प्रश्‍न निर्माण झाले. आंबोलीत घाट रस्त्यावर असलेला मुख्य धबधबा आणि त्याला लागून इतर सहा धबधबे वर्षा पर्यटनाचे मुख्य आकर्षण असते. या जोडीला मुसळधार पाऊस, फेसळणारे पाणी, धुके याचे आकर्षणही असते. 

या आहेत अडचणी
 अतीउत्साही पर्यटकांवर नियंत्रणासाठी सक्षम यंत्रणेचा अभाव
 धबधब्याच्या वरच्या बाजूला आंघोळ करताना प्रवाहाबरोबर 
   येणारे दगड धोंडे अंगावर पडून अपघाताच्या घटना
 घसरून दरीत पडण्याच्या घटनांवर नियंत्रण आवश्‍यक
 वाहतूक कोंडीमुळे इतर वाहन चालकांना होणाऱ्या त्रासावर उपाय गरजेचा 

 हे आहेत उपाय
 हूल्लडबाज पर्यटकांवर नियंत्रणाची व्यवस्था हवी
 सुटीच्या दिवशी जादा पोलिस कुमक गरजेची
 प्रवाहाबरोबर येणाऱ्या दगड धोंड्यांना चुकवण्यासाठी जाळीसारखी व्यवस्था गरजेची
 नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवून रेलिंग आवश्‍यक.
 कावळेसाद, महादेवगड पॉईंटवर विशेष व्यवस्था आवश्‍यक.

Web Title: amboli tourist attraction Waterfalls